सावधान! भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख

सावधान! भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख

ग्लोबल वॉर्मिंग असंच वाढत राहिलं तर भारतातील चार शहरांसह आशिया आणि जगभरातील इतर शहरांचा मोठा भाग 2050 पर्यंत बुडेल.

  • Share this:

संपूर्ण भारतात जवळपास 3.1 कोटी लोक समुद्र किनाऱ्या जवळील परिसरात राहतात. इथे दरवर्षी सागरी पुराचा धोका असतो. 2050 पर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांना याचा फटका बसणार असल्याचं म्हटलं जातं. एवढंच नाही तर या शतकाच्या शेवटी जवळपास 5 कोटींहून जास्त लोकांना याचा फटका बसेल. निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या एका अमेरिकेतील संस्थेच्या रिसर्चनुसार असं म्हटलं जातं की, ग्लोबल वॉर्मिंग असंच वाढत राहिलं तर भारतातील चार शहरांसह आशिया आणि जगभरातील इतर शहरांचा मोठा भाग 2050 पर्यंत बुडेल. यात भारतातील कोणत्या शहरांचा समावेश आहे ते जाणून घेऊ..

मुंबई- नासासारखअया अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत भारतातील जी चार शहरं बुडण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे, यात मुंबईही आहे. गेल्या पावसाळ्यात मुंबईची झालेली दैना सगळ्यांनीच अनुभवली. समुद्राचा स्तर वाढल्यामुळे येत्या काळात उंच लाटांची आणि चक्रीवादळाची शक्यता वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं म्हटलं जातं की, पुढील 30 वर्षांमध्ये मुंबईतील मोठा भाग बुडण्याच्या मार्गावर आहे. मुंबईची लोकसंख्या सध्या पाउणे दोन कोटीपेक्षा जास्त आहे.

चेन्नई- समुद्र सपाटीपासून हे शहर सरासरी 6.7 मीटर उंचीवर आहे. बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मोठा फटका या शहराला बसतो. 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीचा सर्वात मोठा फटका या शहराला बसला होता. या धक्क्यात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारोंहून जास्त लोक बेघर झाली होती.

कोलकत्ता- सीएन ट्रॅव्हलरने गेल्या सप्टेंबरमध्ये यूएनच्या एका रिपोर्टवर सांगितले होते की, हवामान बदलावर एका आंतरराष्ट्रीय पॅनलच्या तज्ज्ञांनी भारतातील ज्या शहरांवर बुडण्याचा सर्वाधिक धोका दर्शवला त्यात कोलकत्ता शहरही आहे. नव्या रिपोर्टनुसार या शहरावरचा धोका हा इतरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. समुद्र सपाटीपासून सरासरी 9 मीटर उंचीवर वसलेल्या या शहराचं नाव प्रदुषण आणि कार्बनडायऑक्साइडसाठी आधीच खराब झालेलं आहे.

सूरत- 20 व्या शतकात मुद्राचा स्तर 16 सेमीपर्यंत वाढला होता. रिपोर्टनुसार या शतकात हा स्तर अजून 2 मीटरने वाढेल. ज्याचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसेल. यामुळे शहर बुडण्याचा धोका तीन टक्क्यांनी वाढला. समुद्रसपाटीपासून जवळपास 13 मीटर उंचीवर हे शहर आहे.

अंदमान- हे बेट येत्या काळात पाण्याखाली जाणार असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेटं येत्या काळात पाण्याखाली जाऊ शकतात. त्यात निकोबार बेट बहुतांशीप्रमाणात पाण्याखाली गेलं आहे. 2050 पर्यंत अंदमान बेट पूर्णपणे पाण्याखाली जाईल, ज्यामुळे तिथे एकही मानवी वस्थी राहणार नाही.

सुई लावताना बाळ रडू नये म्हणून डॉक्टरने केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक

कामाच्या व्यापातून कमी बजेटमध्ये फिरून या पूर्व हिमालय, जाणून घ्या स्पेशल पॅकज

'बाला' प्रमाणे तुमचेही केस गळतात, आता तांदळाचं पाणी येईल मदतीला

 

First published: November 12, 2019, 6:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading