नवी दिल्ली, 24 जुलै : भारतामध्ये सर्वात जास्त मौल्यवान धातू (Precious Metals) म्हणून सोन्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे सुवर्णालंकार घालणं श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं. याशिवाय देवी-देवतांना देखील सुवर्णालंकार घातले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) देखील काही राशींसाठी (Zodiac Sing) सोनं लाभदायक असतं. सोन्याच्या धातूला अध्यात्म आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार करंगळीजवळच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी (Gold Ring) घातल्याने एकाग्रता वाढते. याशिवाय राजयोगाची प्राप्ती होते. करंगळीमध्ये सोन्याची अंगठी घातल्याने अपत्य प्राप्ती होते. वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर, करंगळीमध्ये सोन्याची अंगठी घालावी. पाहूयात सोन्याची अंगठी घातल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होतो.
मेष रास
मेष राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी धारण करावी. यामुळे त्यांचं साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होते. प्रत्येक क्षेत्रात दबदबा निर्माण होतो. कौटुंबीक जीवन आणि जोडीदाराबरोबर संबंध चांगलं होतात. कर्जामधून मुक्ती होते.
(करा स्वत:वर प्रेम,बघा जगणं होईल किती सुंदर)
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचा अलंकार किंवा अंगठी घातल्यामुळे उत्साहात वाढ होते. सिंह रास अग्नी तत्वाची रास मानली जाते. त्याचा स्वामी सूर्य आहे. सोन्याचा कारक गुरु ग्रह आहे. त्यामुळे त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध असतात. त्यामुळे सिंह राशीने सोन्याची अंगठी घातल्यास नोकरी-व्यवसाय यामध्ये देखील प्रगती होते आणि फायदा मिळतो.
(इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी)
कन्या रास
कन्या राशीने सोन्याची अंगठी धारण केल्यास त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात आणि ऐश्वर्याची प्राप्त होते. सोन्याची अंगठी किंवा चैन घातल्यामुळे फायदा होतो. कन्या राशीच्या सातव्या आणि पाचव्या घराचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे सोन्याचे अलंकार त्यांच्यासाठी लाभदायक मानला जातात.
(वडिलांच्या स्वप्नासाठी केले परिश्रम; 22व्या वर्षीच IPS अधिकारी झाल्या पूजा आवान)
धनु रास
धनू राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. यामुळे अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात. धनु राशीचा स्वामी देखील गुरू आहे. ज्यामुळे सोन्याचे अलंकार घातले तर, गुरु ग्रहाची कृपा होते. कामातील अडचणीत संपता आणि सगळ्याच क्षेत्रात प्रगती होऊन आनंदी आनंद होतो.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.