Home /News /lifestyle /

इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी

इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी

ग्रीन टी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. शरीरात साचलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवते.

ग्रीन टी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. शरीरात साचलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवते.

Weight Loss Drink: ग्रीन टीची चव बऱ्याच जणांना आवडत नाही. पण, तिचे आरोग्याला बरेच फायदे असतात.

    नवी दिल्ली, 23 जुलै : चहाच्या कपाबरोबर सकाळ होत असेल आणि वजन कमी (Weight Loss) करण्याची चिंता सतावत असेल तर, ही सवय बदलून ग्रीन टी (Green Tea) प्यायला सुरूवात करा. सकाळचा पहिला चहा म्हणून ग्रीन टी पिणं आवश्यक आहे. आरोग्याला फायदेशीर (Health Benefits) असलेला हा चहा त्याच्या चवीमुळे प्रत्येकालाच आवडतो असं नाही. त्यामुळे ग्रीन टीची टेस्ट बदलून (Change Test) घ्यायला सुरूवात करा. ग्रीन टीमध्ये एन्टीऑक्सिडन्ट (Antioxidant) गुणधर्म भरपूर आहेत. नियमित घेतल्यास अगदी आपण कॅन्सरसारख्या (Cancer) जीवघेण्या आजारांपासूनही स्वत: ला वाचवू शकतो. यात अनेक बायोएक्टिव्ह गुणं आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. टाइप-2 डायबेटीज (Type 2 Diabetes) असलेल्या रुग्णांसाठीही ग्रीन टी खुप फायदेशीर मानली जाते. नियमित घेतल्याने स्किन एजिंगचा परिणाम होत नाही. याशिवाय वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरतं. (लो ब्लड शुगर लेव्हलनेही होते त्रास; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष) करा या पद्धतीने ग्रीन टी जास्तवेळ ग्रीन टी बॅग गरम पाण्यात ठेवली तर त्याची चव खराब होऊ शकते. त्यामुळे चवही कडूही होऊ शकते. ग्रीन टी करताना मंद आचेवर पाणी उकळावा. गॅस बंद करा. (पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी सामोसाच वाईट का?) यानंतर,कपवर एक गाळणी ठेवा आणि गाळणीमध्ये अर्धा चमचा ग्रीन टी घाला. यानंतर,कपमधून वरून पाणी घाला. गाळणीत ग्रीन टी गरम पाण्यात बुडले 2 मिनिटांनंतर चहा तयार आहे. अशी वाढवा टेस्ट ग्रीन टीची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू आणि मध घाला. (ग्रीन टीमुळे खरंच वजन कमी होतं का?) यामुळे चवीबरोबर हेल्थ बेनेफिट्सही वाढतात. याशिवाय हवं असल्यास आलं किंवा थोडी काळी मिरी, वेलची देखील घालू शकता. याने चवीबरोबर फायदेशीर गुणही वाढतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Tea drinker, Weight loss tips

    पुढील बातम्या