दिल्ली,23 जुलै : कोरोना
(Corona) काळात राजस्थानच्या आयपीएस ऑफिसर पूजा आवाना
(Rajasthan IPS officer Pooja Awana) चर्चेत आल्या होत्या. त्यांनी लॉकडाऊनमध्ये
(Lockdown) घरोघरी जाऊन जेवण पुरवलं होतं. तर, औषधांचा काळाबाजारही उघडकीस आणला होता. त्याच पूज आवाना यांनी राजस्थानमधल्या प्रतापगढमध्ये पोस्टींगवर असताना महिला सशक्तीकरणासाठी
(Women Empowerment) काम केलं. त्यांनी प्रतापगडमध्ये एसपी म्हणून काम केलं आहे.
पूजा आवाना यांच्याकडून खरोखरच विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्याला हवी. नोयडाजवळच्या
(Noida) एका गावात राहणाऱ्या पूजा आवाना वयाच्या 22 व्या वर्षी आयपीएस अधिकारी (
IPS officer) झाल्या. मुलीने पोलीस अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
(
हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे)
त्यामुळेच पूजा यांनी यूपीएससीची परीक्षा
(UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये पहिल्यांदा
UPSC ची परीक्षा दिली मात्र, त्यांना अपयश आलं. पहिल्या अपयशातून त्यांनी अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवली आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आपल्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा प्रयत्न केला.
(
लो ब्लड शुगर लेव्हलनेही होते त्रास; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)
पूजा यांनी दुसऱ्या प्रयत्नामध्ये 316 रँक मिळवला. त्यांना राजस्थान कॅडरमध्ये पुष्करमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली होती. सध्या पूजा राजस्थानमध्ये डीसीपी
(DCP) पदावर काम करत आहे. याशिवाय जयपूरमध्ये ट्रॅफिक पोलीस कमिश्नर सारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.
(
मॉन्सूनच्या महिन्यात वाढतंय वजन? अशा पद्धतीने कंट्रोल करा.. सोप्या 7 टिप्स पाहा)
लहानपणापासुनच पूजा अतिशय हुशार होत्या. पूजा विद्यार्थ्यांना एक चांगला सल्ला देतात. त्या सांगतात, आलेलं अपयश किंवा मिळालेले कमी मार्क यामधून खचून न जाता उलट त्या चुका दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा. त्यांनी पहिल्या अपयशानंतर अभ्यासाची रणनिती ठरवून मेहन घेतली. त्यामुळेच दुसऱ्या प्रयत्नात यश आलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.