• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • करायला शिका स्वत:वर प्रेम; बघा जगणं होईल किती सुंदर

करायला शिका स्वत:वर प्रेम; बघा जगणं होईल किती सुंदर

स्वतःची तुलना कोणाबरोबरही करु नका.

स्वतःची तुलना कोणाबरोबरही करु नका.

love yourself : आपण आयुष्यभर दुसऱ्यांवर प्रेम करतो, त्यांना खुश ठेवतो, कधीतरी स्वत:वर प्रेम (Self Love) करून पहा.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जुलै : आयुष्य सुखात जागचं असेल तर,स्वत:वर प्रेम ( Love Yourself) कराला शिका. आपण दुसऱ्यांवर प्रेम (Love for Others) करण्यात आयुष्य घालवतो. इतरांच्या इच्छा पूर्ण (Fulfilling the desires of others) करण्यासाठी राहतो. कधी विचार केला आहे? यात आपण किती आपल्यासाठी जगतो? याचं उत्तर नाही असंच येईल. कधी आईवडिलांची इच्छा, कधी मित्रमैत्रिणी, ऑफिसं, मुलं, कुटूंब यांच्या व्यापात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मागे वळून पाहतांना वाटतं कि जगायचं राहिलं. म्हणूनचं या गोष्टीचा आधीच विचार करा. आपल्याला वाटतं की इतरांनीही आपल्यावर प्रेम करावं. पण, जोपर्यंत आपण स्वत:वर प्रेम करत नाहीत, तोपर्यंत इतर लोकही आपल्यावर प्रेम करत नाहीत. असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वत: वर प्रेम करण्यापेक्षा इतरांवर प्रेम करणं सोपं वाटतं.इतरांच्या नजरेत चांगलं होण्याच्या प्रयत्नात, आपण एकाच वेळी बरेच कॅरेक्टर जगायला लागतो जे आपण नसतो. त्यामुळे आपल्याच मनात निगेटीव्ह (Negative) आणि कडवट भावना निर्माण होते. आपल्या स्वतःच्या उणीवा पाहून आपण आपल्या नजरेत पडू लागतो. हेच आपल्या दुख:चं कारण बनतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करण्यासाठी आयुष्यात कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत म्हणजे नेहमीच आपण आतून आनंदी आणि सकारात्मक राहू शकू याचा विचार करा. (हातावरच्या रेषा सांगतात तुम्ही जाणार पदेशात; तुमच्या हातावर आहे का ‘ती’ रेष?) स्वतःला ओळखा बर्‍याच वेळा स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत? आपल्याला आयुष्य कसं जगायचे आहे? आपली मुल्य काय आहेत? हे ओळखा त्यांना महत्व द्या. नाही म्हणायला शिका गरज असेल तिथे नकार द्यायला शिका. बर्‍याच वेळा आपण कोणालाही वाईट वाटू नये , मन दुखावू नये यातच प्रत्येक गोष्टीला होकार द्यायला लागतो. पण, आवश्यक असेल त्यावेळी नकार द्यायला हवा. तुलना करू नका स्वतःची तुलना कोणाबरोबरही करु नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आणि त्यांची मूल्ये वेगळी असतात. त्यामुळे त्यात तुलना करणं चुकीचं आहे. (लो ब्लड शुगर लेव्हलनेही होते त्रास; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष) आपली ताकद ओळखा आपल्याबद्दल कोणी वाईट बोलं तर, लगेच ते मनाला लावून घेऊ नका. स्वतःच्या चांगल्या गोष्टी विसरून जाऊ नका. आपली ताकद, जमेची बाजू यांच्यावर विश्वस ठेवा. स्वत:ला ट्रिट द्या काही चांगलं काम केलं, काही अचिव्हमेन्ट केली असं वाटतं असेल तर, स्वत:ला ट्रिट द्यालला विसरू नका. असं केल्याने मनाला आनंद मिळेल. छोट्यातल्या छोट्या गोष्टीत स्वत:लाचं शाब्बासकी द्या. स्वतःला माफ करण्यास शिका कधीकाळी काही चुक झाली असेल तर,आयुष्यभर त्याचा पश्चात्ताप करू नका,स्वत: ला माफ करा आणि पुढे जा. (पावसळ्यात वाढत्या वजनाची चिंता नको; आहार नियंत्रित करणाऱ्या ’या’ आहेत जबरदस्त Ti) प्रत्येकाल आपण आवडू शकत नाही हे लक्षात ठेवा आपण प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना आनंदी ठेवावं असं वाटत तर, ते अशक्य आहे. सर्वांना आनंदी करण्याच्या नादात आपण, स्वतःला आंनंदी ठेवणं विसरून जातो. एन्जॉयमेन्ट आवश्यक आपल्या आयुष्यात करियर किंवा पगाराबरोबरच कामातून मिळणारा आनंदही महत्वाचा आहे. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा. (बॉडी वॅक्सिंगसाठी वापरा ही ट्रिक; अनावश्यक केस होतील गायब) आपली प्रत्येक अचिव्हमेंट लक्षात ठेवा आजपर्यंत आपण जे काही साध्य केले ते एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा त्या आठवणींचे फोट एखाद्या फ्रेममध्ये सजवा. ती फ्रेम रोज पहा. यामुळे आत्मविश्वास वाढेल.स्वतःची काळजी घ्या आपलं शरीर आणि आपलं मन आपले खरे जोडीदार आहेत त्यांची काळजी घ्या. मन आणि शरीर स्वस्थ असेल तरच उत्साह वाढतो.
    Published by:News18 Desk
    First published: