मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वरुण आणि नताशा विवाहबंधनात: पण त्यांच्याविषयी काय माहिती Google Search होतेय पाहा

वरुण आणि नताशा विवाहबंधनात: पण त्यांच्याविषयी काय माहिती Google Search होतेय पाहा

varun dhawan & natasha dalal - News18 lokmat

varun dhawan & natasha dalal - News18 lokmat

वरुण धवनने (Varin Dhawan wife) कोणाशी लग्न केलं यात इंटरेस्ट असणं समजू शकतो, पण नेटकरी भलतीच माहिती अधिक शोधत आहेत. वाचा तुम्हीच

मुंबई,25 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) अखेर 24 जानेवारीला त्याच्या जुन्या मैत्रिणीबरोबर विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत(Natasha Dalal) लग्नगाठ बांधली. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचबरोबर नेटीझन्सना नताशा दलालविषयी जाणून घेण्यात देखील रस आहे. नताशा कोण आहे एवढंच नाही तर तिच्याऐवजी वरुण धवनचे सासरे कोण यातच नेटकऱ्यांनी जास्त रस दाखवला आहे. नताशा दलाल (Natasha Dalal) ही कोणत्या जातीची आहे हे मोठ्या प्रमाणात सर्च झाल्यानंतर आता तिचे वडील राजेश दलाल (who is rajesh dalal) यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती सर्च केली जात आहे. varun dhawan father in law असा सर्च देऊन त्यांचा व्यवसाय आणि कमाईचे आकडे देखील मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहेत. कोण आहेत राजेश दलाल? नताशा दलाल हिचे वडील राजेश दलाल(Rajesh Dalal) बिजनेसमॅन आहेत. देशभरात त्यांचा व्यवसाय पसरला आहे. दलाल कुटुंबियांचे बॉलिवूडबरोबर काहीही कनेक्शन नाही. नताशा उद्योगपती राजेश दलाल (Rajesh Dalal) व गौरी दलाल (Gauri) Dalal) यांची मुलगी आहे. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शाळेतून नताशानं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तो आणि नताशा एकमेकांना शाळेपासून ओळखत होते परंतु डेट करत नव्हते. नताशा दलालने फॅशन डिझायनिंग क्षेत्रात डिग्री मिळवली आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. भारतात परतल्यानंतर नताशानं प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. तिने नताशा दलाल लेबल नावाने ड्रेस लॉन्च केले. तिने डिझाईन केलेल्या कपड्याची खासियत म्हणजे ती लग्न व वधूसाठीचे प्रसिद्ध आहेत. वरुण आणि नताशा यांच्या लग्नाची बातमीम समोर आल्यानंतर भारतीयांनी गुगलवर नताशा दलाल हिची जात, वय आणि तिचे वडील कोण आहेत याविषयी देखील मोठ्या प्रमाणात सर्च केलं.

हे देखील वाचा - मितालीसोबत लग्न पण आता सखीच्या 'प्रेमात' सिद्धार्थ; लवकरच समोर येणार अनोखी लव्हस्टोरी

दरम्यान, वरुण धवनने (Varun Dhawan) इन्स्टाग्रामला विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने शानदार कॅप्शन देखील दिलं आहे. "Life long love just became official असे कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत. या विवाह सोहळ्यात वरून आणि नताशा यांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. वरून धवन याने सिल्वर कलरची शेरवानी आणि त्याला साजेशी अशी मोजडी घातली होती. तर नताशा हिने सिल्वर रंगाचा घागरा आणि त्यावर शोभेल असे दागिने घातले होते. दोघेही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहेत.
First published:

Tags: Google, Social media trends

पुढील बातम्या