वरुण धवन आज त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नताशा लाईम लाईटपासून अनेकदा लांब असल्याचं दिसतं. पण तिचंही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे. (Photo Credit- @varundvn/Instagram)
वरुणने करण जोहरच्या चॅट शोमध्ये, तो आणि नताशा एकमेकांना शाळेपासून ओळखत असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ते दोघे एकमेकांना डेट करत नव्हते, पण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं त्याने सांगितलं. (Photo Credit- @varundvn/Instagram)
नताशा शाळेच्या दिवसांपासूनच अतिशय सपोर्टिव्ह होती आणि नेहमीच तिने मला साथ दिली असल्याचंही वरुणने चॅट शोमध्ये सांगतलं होतं. (Photo Credit- @varundvn/Instagram)
नताशा दलालने फॅशन डिझायनिंग क्षेत्रात डिग्री मिळवली आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने डिझायनिंग क्षेत्रातच काम सुरू केलं. तिचा एक क्लोदिंग ब्रँडही आहे, जो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पसंतही केला जातो. (Photo Credit- @varundvn/Instagram)
रिपोर्ट्सनुसार, 16 मार्च 1989 मध्ये मुंबईत नताशाचा जन्म झाला. नताशा दलालच्या वडिलांचं नाव राजेश दलाल असून ते व्यावसायिक आहेत. नताशाही वडिलांप्रमाणेच आता प्रसिद्ध, यशस्वी बिझनेसवुमन बनली आहे. (Photo Credit- @varundvn/Instagram)