नवी दिल्ली,08 जुलै : हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान रत्नांपैकी **(Precious Gems)एक आहे. महिलांचं तर,हिरा (Diamond) सर्वात आवडतं रत्न आहे. हिर्याचा संबंध शुक्र ग्रहाची जोडला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये (According to Astrology) शुक्र ग्रहाला भौतिक सुखसुविधांचा कारक मानलं जातं. पण, हिरा सगळ्यांनासाठीच फायदेशीर नसतो. हिरा वापरल्यामुळे काही लोकांना अडचणींचा सामना (Difficulties) करावा लागतो. अशा लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या(Problem)**निर्माण होतात. हिरा काही लोकांसाठी वरदानही ठरतो. त्यामुळेच हिरा परिधान करताना ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हिरा कोणत्या राशीच्या लोकांनी **(**Zodiac Signs) घालावा यासंदर्भात ज्योतिष शास्त्रज्ञ (Astrologer) काय सल्ला देतात हे जाणून घेऊयात. ( Chanakya Niti: अतिप्रमाणात सहनशीलता बरी नव्हे; लोक ठरवतील भित्रट ) हिरा धारण करण्याने होतात फायदे हिरा शुक्र ग्रहाच्या कृपादृष्टीसाठी घातला जातो. एखाद्या व्यक्तीला हिरा परिधान करणं लाभदायक ठरलं तर, त्यांच्या आयुष्यात कसलीच कमतरता राहत नाही. हिरा परिधान केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होतो. नातेसंबंध चांगले होतात. वैवाहिक जीवनासाठी हिरा लाभदायक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार कला, मीडिया,सिनेमा,फॅशन अशा कलात्मक क्षेत्रांशी निगडित लोकांनी हिरा घालणं शुभ असतं. मात्र हिरा परिधान करण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. ( 4 राशींच्या मुली असतात बुद्धिमान; पत्नी म्हणून लाभल्या तर होतो सुखाचा संसार ) राशींवर हिऱ्याचा परिणाम वृषभ,मिथुन,कन्या,मकर,तुला आणि कुंभ लग्न राशीमध्ये जन्मलेल्या लोकांना हिरा शुभ (Lucky) मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ आणि तुला लग्न असणाऱ्या लोकांना हिरा खुप चांगला परिणाम देतो. मेष,सिंह,वृश्चिक,धनु आणि मीन लग्न राशीच्या लोकांना हिरा अशुभ मानला जातो. ( राशीभविष्य: 2 राशींसाठी संभ्रमाचा दिवस; विवेकानेच निर्णय घ्या ) ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक लग्न रास असणाऱ्या लोकांनी चुकूनही हीरा परिधान करू नये. फॅशन म्हणून जरी हिरा परिधान करायचा असेल तरीदेखील ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्यावा (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.