मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

4 राशींच्या मुली असतात बुद्धिमान; पत्नी म्हणून लाभल्या तर होतो सुखाचा संसार

4 राशींच्या मुली असतात बुद्धिमान; पत्नी म्हणून लाभल्या तर होतो सुखाचा संसार

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (Astrology) 4 राशीच्या मुली हुशार आणि सुंदर असतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,06 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. राशी प्रमाणे मुली आणि महिलांच्या स्वभावावर परिमा होत असतो. काही राशींच्या मुली उत्तम लाईफ पार्टनर ठरतात. त्या स्वत:बरोबर कुटूंबाचीही उन्नती करतात.

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या मुली या बुद्धिमान आणि सुंदरही असतात. अशा मुली आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून समाजामध्ये प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळवतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्याच्या राशी.

(बापरे! आता आधीच कळेल मृत्यूची तारीख, मरणाची भविष्यवाणी करणारं कॅलक्यूलेटर)

मेष रास

मेष राशीच्या मुली साहसी, निडर आणि धैर्यवान असतात. त्या आपल्या करीयरच्या बाबतीत कोणतंच कॉम्प्रोमाईज करत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे लोकांवर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळतो. मेष राशीच्या मुली स्वतःच्या हिमतीवर ती स्वतःचं करिअर घडवतात.

(राशीभविष्य: 'या' राशींसाठी दिवस असणार मध्यम; पाहा काय आहे तुमची आजची ग्रहस्थिती)

सिंह रास

सिंह राशीच्या मुली प्रतिभावंत,साहसी, गंभीर आणि स्वाभिमानी असतात. आपली मतं स्पष्टपणे मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्या इमानदार आणि मेहनती असतात. त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. करिअरमध्ये देखील मोठा स्थान मिळतात, ओळख निर्माण करतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचे लोक बुद्धिमान असतात. या राशीच्या मुली तल्लख बुद्धीच्या बोल्ड, निडर आणि साहसी असतात. या मुलींना कोणासमोरच वागायला आवडत नाही. समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी त्यांची इच्छा असते आणि त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी असते.

(राशीभविष्य: 'या' राशींसाठी दिवस असणार मध्यम; पाहा काय आहे तुमची आजची ग्रहस्थिती)

कुंभ रास

कुंभ राशीच्या मुली चतुर आणि बुद्धिमान असतात. त्या शिस्तप्रिय आणि गंभीर स्वभावाच्या असतात. त्यांना आपला सन्मान सर्वात जास्त प्रिय असतो. कोणाचे उपकार घ्यायला त्यांना आवडत नाही. समाजामध्ये चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा असते. या मुलींनी करिअर घडवण्याचा निश्चय केला तर त्या आपलं ध्येय गाठतातच. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark