मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: 2 राशींसाठी संभ्रमाचा दिवस; विवेकानेच निर्णय घ्या

राशीभविष्य: 2 राशींसाठी संभ्रमाचा दिवस; विवेकानेच निर्णय घ्या

राशीभविष्य (Today's Horoscope) जाणून घ्या आणि त्याबरोबर केतू या छायाग्रहाची  माहिती घेऊ या.

राशीभविष्य (Today's Horoscope) जाणून घ्या आणि त्याबरोबर केतू या छायाग्रहाची माहिती घेऊ या.

राशीभविष्य (Today's Horoscope) जाणून घ्या आणि त्याबरोबर केतू या छायाग्रहाची माहिती घेऊ या.

    आज बुधवार दिनांक 7 जुलै 2021.आज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी. आज चंद्र दिवसभर वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. राशीभविष्य (Today's Horoscope) जाणून घेण्यापूर्वी आज केतू या ग्रहाची  माहिती घेऊ या. केतू हा छाया ग्रह आहे. सूर्य चंद्राच्या भ्रमण कक्षेच्या छेदन बिंदू ना  राहू केतू असे नाव आहे.

    केतू म्हणजे  नुसते  शरीर  किंवा धड .केतू आध्यात्मिक प्रगती चा कारक आहे. विचक्षण बुद्धी, विविध शास्त्रा विषयी खोल ज्ञान, आणि वैराग्य  याचा कारक केतू आहे. केतू चा स्वभाव मंगळा सारखा आहे. साक्षात रुद्र आहे. पलाश पुष्पा सारखाच रंग व शिरावर तेजस्वी तारा असा हा केतू ग्रह उच्च अवस्थेत  म्हणजे  धनु किंवा मीन राशीत  आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा व विकारां पासून मुक्ती देतो. मिथुन ही नीच राशी आहे. कुंडलीत केतू  हा कोड, कॅन्सर, किंवा रक्तदोष या रोगांचा कारक आहे. अश्विनी, मघा अणि मूळ  नक्षत्राचा स्वामी केतू आहे. केतू रत्न वैदूर्य किंवा cat's eye (लसण्या) हे आहे. श्री गणेशाचे पूजन  व केतू मंत्र  जप करावा. ओम  कं. केतवे नम: हा केतू जप आहे.

    आता बघूया बारा राशींचे भविष्य

    मेष

    आजही दिवस फारशी दगदग न करता पार पडेल. आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. कुटुंबाला महत्व द्या. त्यांच्या मागण्या पूर्ण करा. शरीर थोडे  शिथिल राहील. अंगदुखी जाणवेल. दिवस शुभ आहे.

    वृषभ

    आरोग्य ठीक राहील. मन जरी अस्वस्थ असले तरी  काळजी नको. हळुहळु सगळे ठीक होईल. तुमच्या चिकाटी, परिश्रम, अणि जिद्दीचे फळ मिळणार आहे. आर्थिक लाभ. दिवस चांगला आहे.

    मिथुन

    व्यय, मग तो पैशाचा असो, बुद्धीचा असो किंवा  आरोग्याचा, त्रासदायक असतो. आज असेच काहीसे  वाटेल. सूर्य  मदत करेल. पण एकूण दिवस फारशी उलाढाल ना करता घालवावा. कष्ट  होतील. मध्यम दिवस.

    कर्क

    नवीन हवे हवेसे वाटणारे परिचय होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य ठीक राहील. आज आपण काही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. दिवस चांगला.

    सिंह

    भरपूर काम, फोन, भेटी गाठी, महत्त्वाचा निर्णय  असा हा दिवस आहे. खर्च जरा जपून करा. अचानक नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ आहे.

    कन्या

    भाग्यातील चंद्र राहू आजही  संभ्रमात ठेवतील. दिवस काही विशेष काम उरकून टाकण्याचा आहे. फार विचार करणे, चिकित्सा करणे हा तुमचा स्वभावधर्म असतो. पण त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. दिवस बरा आहे.

    तुला

    अष्टमात असलेले चंद्र राहू आजही मानसिक ताण,शरीर कष्ट दर्शवतात. कार्य क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. मिथुन राशीतील सूर्य, भाग्य उत्तम राहील. सर्दी पडसे अंग दुखी होऊ शकते. दिवस मध्यम  आहे.

    वृश्चिक

    राशीत केतू,व सप्तमात चंद्र राहू योगाने थोडा कठीण दिवस आहे. सामाजिक जबाबदाऱ्या घेणे तुम्हाला आवडते. पण त्यापासून मनस्ताप होऊ शकतो. कोणाशी शाब्दिक चकमक झाली तरी धैर्याने काम पुर्ण करा. दिवस मध्यम.

    धनु

    आर्थिक नुकसान, वाहनांसाठी खर्च, किंवा एखाद्या मोठ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी कर्ज  असा हा दिवस फारसा अनुकूल नाही. दुखापत   होण्यापासून जपा. शत्रू वर मात करू शकाल. दिवस मध्यम आहे.

    मकर

    तुम्ही सर्व कामे विचारपूर्वक करता. आज मन थोडे  द्विधा होणार आहे. विवेक बुद्धी  जे सांगेल  तोच निर्णय घ्या. मुलांची चिंता असेल तर त्याचे निरसन करून घ्या. विचारात  परिवर्तनाची गरज आहे.

    कुंभ

    चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा चंद्र मानसिक दृष्ट्या चांगला आहे. पण राहू चिंता वाढवेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. शत्रू तुमच्या पुढे टिकणार नाहीत. प्रभाव शाली दिवस.

    मीन

    आज मंगळवार, पंचमात मंगळ शुक्र मुलां संबंधी काही  चिंता निर्माण करतील. चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवत असेल तर घरा बाहेर पडा. गुरु उपासना सुरू ठेवणे योग्य राहील. दिवस मध्यम आहे.

    First published:
    top videos

      Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya