मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोनाला हरवायचय! तणावात नैराश्य झटकून उभे राहा; या टीप्स देतील नवी दिशा

कोरोनाला हरवायचय! तणावात नैराश्य झटकून उभे राहा; या टीप्स देतील नवी दिशा

कोणत्याही परिस्थीत तुम्हाला पॉझिटीव्ह रहायचं आहे

कोणत्याही परिस्थीत तुम्हाला पॉझिटीव्ह रहायचं आहे

जेव्हा सगळीकडे मृत्यू, अनिश्चितता, अविश्वासाचं वातावरण आहे. तिथेच शाळा, कॉलेज, बिझनेस बंद पडलेत. लोक भीती आणि चिंतेच्या वातावरणात जगत आहेत. अनिश्चितता हा आयुष्याचा भाग आहेच पण आता आपल्याला सुरक्षीत वाटणे म्हणजे काय? आयुष्य म्हणजे काय? हे कळालेलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 एप्रिल : 2020 या वर्षात आपण किती वेळा असं बोलो की हे वर्ष वेगळे आहे, हे वर्ष लवकर सरुदे. कारण या वर्षी कोरोना (Corona) सारख्या साथीच्या रोगाने जगण्याचे आयामच बदलले आहेत. 2020 च्या या पेंडॅमिक पिरेड (Pandemic period) नंतर आयुष्य खरचं बदललं आहे. “during these uncertain times”  किंवा “this is our new normal”? हा उल्लेख आता सुरु झालाय. कारण कोरोनाने आपल्या जगण्याला नवा आकारच दिला आहे. दृष्टीकोन (Attitude) बदला आहे.

कोरोनाने अनेकाचे प्रियजन हिराऊन नेले. त्यांच जे नुकसान झालेय. ते कधीच भरुन निघणार नाही. कोरानामधून आपण काय शिकलो याचा विचार करायला हवा. कोरोनाने सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन तर शिकवलेच आहे. पण कोरोनाने सार्वजनिक ठिकाणे, जीम, थिएटर, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये न जाता आपण जगू शकतो हेही दाखवून दिलंय.

(OSCAR 2021 : प्रियांका चोप्राचा The White Tiger जिंकणार ऑस्कर? एका क्लिकवर वाचा)

जेव्हा सगळीकडे मृत्यू, अनिश्चितता, अविश्वासाचं वातावरण आहे. तिथेच शाळा, कॉलेज, बिझनेस बंद पडलेत. लोक भिती आणि चिंतेच्या वातावरणात जगत आहेत. अनिश्चितता हा आयुष्याचा भाग आहेच पण आता आपल्याला सुरक्षीत वाटणे म्हणजे काय? आयुष्य म्हणजे काय? हे कळालेलं आहे.

सकारात्मक दृष्टीकोन आणि सॅनिटायझेशन

जीवन एक अनिश्चीत गोष्ट आहे, हे आपल्याना या महासाथीशी झुंज देताना नव्याने कळले आहे. मोठमोठे बिझनेसमन, छोटेमोठे उद्योजक आणि सरकारसुद्धा यातुन वाचलेल नाहीये. आपण आर्थिकदृष्या सुरक्षित आहोत म्हणेजच सुरक्षा हा किती मोठा भ्रम होता हे स्पष्ट झालंय, म्हणूनच हरल्यासारखं वाटत असेल तर स्वत:ला सांगा आयुष्य पुर्वपदावर येणार आहे. स्वत:ला सकारात्म आणि आशावादी रहा.

(या बँक ग्राहकांना मिळतेय 5 लाख रुपयांची खास सुविधा; असा मिळेल फायदा)

1  कृतज्ञता

विचार करा की, याकाळात इतरांपेक्षा तुमचं कमी नुकसान झालंय. सर्वाबरोबर सलोख्याने रहा. अगदी लहानग्यांशीही प्रेमाने रहा. आपले मित्र, प्रियजनांशी संपर्क साधा, संवाद करा, कदाचीत आयुष्याने दिलेली ही शेवटची संधी आहे अशा प्रकारे आयुष्य जगा. जेजे करायचे राहिले आहे तेते करा. खुश रहा. आपल्या आप्तस्वकीयांना आनेद द्या.तुम्ही गृहीत धरलेल्या कितीतरी गोष्टी कशा अनिश्चित होत्या हे या कोरोनाकाळाने दाखवलंय. खरचं कोणत्या गोष्टी आयुष्यात सर्वार्थाने महत्वाच्या आहेत हेही दाखवून दिलंय.

लोकांबरोबर कृतज्ञतेने वागायला सुरुवात करा. विचार करा अशा कोणत्या गोष्टी आयुष्यात राहिल्यात ज्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. कृतज्ञता व्यक्त केल्याने ऋणानूबंध नव्याने जुळती.

(GOOD NEWS! भारतीय हवाई दल जर्मनीतून आणणार 23 ऑक्सिजन प्लांट)

2 नवा दिवस नवी सुरुवात

कोरोनाने सगळ्यांना घरी बसवले. कामधंदे सोडून, ठराविक दिनचर्या सोडून केवळ घरी राहणे शिकवले. त्यामुळे दिवसाचं शेड्यूल अगदी स्ट्रिक्टली फॉलो करणाऱ्या लोकांचं शेड्यूल बदललं आहे. म्हणून आता आहे त्या परिस्थिती कसं जगायचे हे शिका. नवीन कॅलेंडर बनवा. आपले फ्युचर प्लॅन बनवा. जबाबदाऱ्या, कर्तव्य, लक्ष, स्वप्न याची पुन्हा यादी बनवा. त्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतील. शेड्यूल बनवल्यानंतर मनात कंट्रोलची भावना निर्माण होईल. आपलं आयुष्य आपल्याचं ताब्यात आहे असं वाटल्याने पॉझिटीव्ह आणि प्रोडक्टीव्ह भावना वाढेल.

3 नात्यांना प्राधान्य द्या

आपले सहकारी,नातलग, जुने मित्रमैत्रीणी ज्यांच्याशी इच्छा असूनही संपर्कात राहता आलं नाही अशांशी बोला. आता सर्वांना भेटणं शक्य नाही. पण, टेक्नोलॉजी आहे. फोन करा, व्हीडिओ कॉल करा, त्याचं तुमच्या आयुष्यातला महत्व त्यांना सांगा. सामाजिक विलगीकरण टाळण्यासाठी जे करु शकता ते करा.

(सुपरस्टार सलमान खानने 'या' अभिनेत्रीमुळे चित्रपटांत दिला नाही Kissing Scene,)

जुन्या मित्रमैणींशी संवाद केल्यास जुन्या आठवणी जाग्या होतील. त्यामुळे भिती आणि एकचेपणाची भानवा नाहीशी होईल. त्यामुळे वाट पाहु नका लगेच फोन करा. आनंद द्या आनंद घ्या.

4 स्वच्छता आणि सुरक्षा

पुर्वी प्रमाणे आताचे दिवस नाहीत. पण कोणत्याही परिस्थीत तुम्हाला पॉझिटीव्ह रहायचं आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही काय काय कारु शकता याची यादी बनवू या.

1 निराश वाटत असेल तेव्हा गरम पाण्याने आंघोळ करा.

2 वाचन करा.

3 ध्यान करा.

4 निर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. बाहेर जाणं शक्य नसेल तर, घरातच वॉक करा.

5 हा वेळ फॅमिलीबरोबर क्वॉलिटी टाईम म्हणून घालवा. डिनल प्लॅन बनवा.

6 इच्छा असेल तर, आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा.

7 आवडती गाणी ऐका.

8 जीममध्ये जायचं नसेल तर, घरातच व्यायम किंवा फिजीकल मुव्हमेंट करत रहा.

9 नकारात्मक बातम्या पाहणे टाळा. नकारात्मकतेपासून दूर रहा.

10 लोकांशी संपर्क वाढवण्याला महत्व द्या.

11 नवीन बिझनेस प्लॅन बनवा.

12 आपल्या स्वप्नांची यादी बनवा.

(कौतुकाची थाप! चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयूरला 'जावा' तर्फे चकचकीत बाईक)

या सगळ्या गोष्टी सकारात्मकता वाढवतील. आपण निरोगी राहण्यासाठी सकारात्मक राहणे आवश्यक आहे. या सोप्या पद्धतीने मनातली भिती आणि चिंता दूर होतील.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Positive story, Positive thinking