मुंबई 24 एप्रिल : ऑस्कर सोहळ्याची (Oscar awards) संपूर्ण तयारी ही आता होत आली आहे. तर जगभरातून प्रेक्षक या सोहळ्याची आतूरतेने वाट पाहत असतात. तर आपल्या आवडत्या नायक, नायिकेला, चित्रपटाला पुस्कार घेताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. यंदा 93 वा ऑस्कर सोहळा पार पडणार आहे. तर भारतात सोमवारी 26 एप्रिलला हा सोहळा पाहता येणार आहे. येत्या रविवारी 25 एप्रिल 2021 ला हा पुस्कार सोहळा पार पडणार आहे. लॉस एन्जेलेसमध्ये सोहळा पार पडेल. तर भारतीय वेळेनुसार 26 एप्रिलला सकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल व तीन तासानंतर म्हणजेच 8:30 ला समाप्त होईल. भारतीय प्रेक्षकांना हा सोहळा Oscar.org या वेबसाइट तसेच ऑस्करच्या अधिकृत युट्युब चॅनल वरही हा सोहळा पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरही हा कार्यक्रम पाहता येईल.
आमिरच्या लेकीचा बोल्ड अंदाज; आयरा खान हॉट PHOTO मुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेतऑस्करचं भारतीय कनेक्शन म्हणजेच ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट रुपांतरित स्क्रीनप्ले श्रेणीत (Best Adapted Screenplay category) या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas), राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि आदर्श गौरव (Adarsh Gaurav) यांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. तर प्रियंका चोप्राने या चित्रपटाची सहनिर्माती होती. यावेळी सोहळ्याच स्वरुप वेगळं असणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभूमीवर हे वेगळं नियोजन करण्यात आलं आहे. ऑस्कर अकादमीने यावेळी त्यांचे नामांकनांचे काही नियमही शिथिल केले आहेत. अनेक चित्रपटांचं प्रदर्शन रखडलं होतं. त्यानंतर ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. त्यांनाही नामांकन देण्यात आली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत ‘नोमाडलँड’ (Nomadland), ‘द ट्रायल ऑफ शिकागो 7’ (The Trial Of Chicago 7) या चित्रपटांची आघाडी पहायला मिळत आहे. नामांकनं इथे पहा सगळी नामांकन सर्वोत्कृष्ट अभिनेता रिज अदमद (Riz Ahmed) – साउंड ऑफ मेटल (Sound of Metal) चडविक बोसमन (Chadwick Boseman) – मा रेनीस ब्लॅक बॉटम (Ma Rainey’s Black Bottom) अँथनी होपकिन्स (Anthony Hopkins) - द फादर (The Father) गॅरी ओल्डमन (Gary Oldman) – मंक (Mank) स्टिवन युन (Steven Yeun) – मीनारी (Minari) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विओला डेविस (Viola Davis) - मा रेनीस ब्लॅक बॉटम (Ma Rainey’s Black Bottom) अँड्रा डे (Andra Day) – द युनाटेड स्टेट्स वि. बिल्ली होलिडे (The United States Vs Billie Holiday) विनेसा किर्बि (Vanessa Kirby) – पिसेस ऑप वुमन (Pieces of a Woman) फ्रान्सेस मॅकडोर्म्नड (Frances McDormand) - नोमाडलँड (Nomadlan) कॅरी मुल्लीगन (Carrey Mulligan) – प्रोमिसिंग यंग वुमन (Promising Young Woman)