Home /News /mumbai /

कौतुकाची थाप! चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयूरला 'जावा' तर्फे चकचकीत बाईक

कौतुकाची थाप! चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयूरला 'जावा' तर्फे चकचकीत बाईक

मयूर शेळकेनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रेल्वे काही फुटांवर असूनही रेल्वे ट्रॅकवर जात त्या मुलाचा जीव वाचवला होता. सीसीटिव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली होती.

    मुंबई, 24 एप्रिल : स्वतःचा जीव धोक्यात घालत चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळके या पॉइंट्समनची सध्या देशभरात चर्चा आहे. सर्वच स्तरातून यासाठी मयूरचं कौतुक झालं. स्वतः रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री यांनी याबद्दल त्याचं कौतुक केलं. त्यानंतर दुचाकी कंपनी जावानंही मयूरला बाईक देण्याची घोषणा केली होती. ती पूर्ण करत जावानं त्याला त्या शौर्यासाठी एक बाईक गिफ्ट केली आहे. (वाचा-गौरी नव्हे तर काजोलला समजत होता शाहरुख खानची पत्नी, वरुण धवनचा भन्नाट किस्सा) यानंतर मयूर शेळकेचं सर्वांनी कौतुक केलं. रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोनवर बोलत त्यांचं कौतुक केलं. या शौर्यासाठी रेल्वेनं मयूरला 50 हजारांचं बक्षीस देण्याची घोषणा केली. त्यावर मयूरनं मोठेपणा दाखवत यापैकी अर्धी रक्कम त्या मुलाच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची असल्यानं त्यानं त्यांना मदत केली. आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत मयूरचं कौतुक केलं होतं. (वाचा - सही पकडे है...राऊतांच्या 'ACP प्रद्युम्न' विरोधात चित्रा वाघांची 'भाभीजी' स्टाईल) एकीकडं कौतुक सुरू असतानाच प्रसिद्ध बाईक कंपनी जावानंही मयूरला या साहसाबद्दल एक बाईक गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. जावाचे संचालक अनुपम थरेजा यांनी ही घोषणा केली. 'जावा हिरोज इनिशिएटिव' अंतर्गत Jawa Forty Two ही बाईक त्यांनी बक्षीस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं. जावानं नुकतीच मयूर शेळके यांना ही बाईक गिफ्ट केली. यावेळी मयूर यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही होते. या बाईकची एक्स शोरूम प्राईज 1 लाख 84 हजार आहे. अत्यंत आकर्षक आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेली ही बाईक मिळाल्यानं मयूरनंही आनंद व्यक्त केला आहे. मुंबईच्या वांगणी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी एक चिमुरडा आईबरोबर जाताना तोल घसरून पडला होता. त्याचवेळी एका बाजुनं रेल्वे येत होती. तेव्हा मयूर शेळकेनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रेल्वे काही फुटांवर असूनही रेल्वे ट्रॅकवर जात त्या मुलाचा जीव वाचवला होता. सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली होती. चिमुरड्याची आई अंध होती आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये हा प्रकार घडला होता. मुलाला वाचवून मयूरही सुखरुप बचावला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai News, Railway, Railway accident

    पुढील बातम्या