नवी दिल्ली, 24 एप्रिल : जर तुम्ही आयडीबीआय (IDBI) बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँकेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. IDBI सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) ग्राहकांना आपली बचत सुविधेनुसार, जोडण्यासाठी मदत करतं. ग्राहक एक फिक्स्ड रक्कम दर महिन्याला जमा करू शकतात. तुमच्याद्वारे ठरलेली फिक्स्ड रक्कम दर महिन्याला ग्राहकांच्या सेविंग्स अकाउंटमधून कट केली जाईल. यामुळे ग्राहकांना नियमित बचतीचा फायदा मिळतो, तसंच 5 लाख रुपयांची सुविधाही मिळते. काय आहे SSP चं वैशिष्ट्य - - भविष्यासाठी प्री-प्लान सेविंग्स - एका निश्चित कालावधीसाठी रेग्युलर सेविंग्स - 1 ते 10 वर्षांपर्यंत पैसे जमा ठेवण्याची सुविधा - 100 रुपयांपासून डिपॉझिटची सुरुवात - SSP प्लस प्रिंसिपल + इंट्रेस्ट प्रोटेक्शनसह कॉम्प्लिमेंट्री इन्शोरन्स कव्हर आणि रिवार्ड पॉईंट्ससह नियमित बचतीची सोय
(वाचा - वर्षभरानंतर आले ‘अच्छे दिन’! मोदी सरकारने रोजगारासंबंधी दिली दिलासादायक बातमी )
5 लाखांपर्यंत पर्सनल अॅक्सिडेंट इन्शोरन्स कव्हर - - मिनिमम एलिजिबल इन्स्टॉलमेंट अमाउंट 5000 रुपये आणि 100 रुपयांच्या पटीत अमाउंट असू शकते. - मिनिमम एलिजिबल टेन्योर 3 वर्ष आणि अधिकाधिक 10 वर्ष - एक व्यक्ती किंवा HUF हे अकाउंट सुरू करू शकतात.
IDBI Bank SSP Plus- Grow your hard-earned money through easy monthly installments. Enjoy Regular Savings with
— IDBI BANK (@IDBI_Bank) April 20, 2021
✅Principal Plus Interest Protection
✅Plus Complimentary Insurance Cover upto ₹5 lakhs
✅Plus Upto 1,000 Redeemable Reward Points pic.twitter.com/VLYf3i5oSW
कसा करता येईल अर्ज? IDBI बँकेच्या सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅनसाठी अर्ज करण्यासाठी, इंटरनेट बँकिंग किंवा Go Mobile + App वर जावं लागेल. येथे ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याशिवाय बँकेच्या जवळच्या ब्रांचमध्ये जाऊन अर्ज करता येऊ शकतो.