मुंबई, 24 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) सलमान खानच्या (Salman khan) आगामी ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe-Your Most Wanted Bhai ) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि एकचं खळबळ माजली. कारण कधीही ‘ऑनस्क्रीन’ ‘किसिंग सीन’ न देणाऱ्या सलमानने यामध्ये चक्क दिशा पाटनी (disha patani) सोबत एक किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चासुद्धा सुरु आहेत. आत्ता सलमानच्या ऑनस्क्रीन ‘नो किसिंग’ पॉलिसीचं सत्य समोर आलं आहे. यापाठीमागे अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) खरं कारण असल्याचं म्हटलं जातं आहे. पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरणं,
अभिनेता सलमान खानने आपल्या पूर्ण कारकिर्दीत एकही किसिंग सीन दिलेला नव्हता. त्याने स्वतःची एक पॉलिसीचं बनवली होती. त्यानुसार तो कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन देत नव्हता. मात्र ही पद्धत किंवा हा नियम सलमानने का घातला याचा खुलासा आत्ता झाला आहे. एका युटयूब चॅनलच्या माहितीनुसार, सलमान खानचा सुपरहिट चित्रपट आणि अभिनेता म्हणून असलेला पहिलाच चित्रपट ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातच त्याने स्वतः शी ठरवलं होतं की काहीही झालं तरी किसिंग सीन द्यायचा नाही. आणि याचं कारण आहे या चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन. ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री यांच्यावर एक किसिंग सीन चित्रित करण्यात येणार होता.
मात्र अभिनेत्री भाग्यश्री त्यावेळी आपला बॉयफ्रेंड असलेला हिमालय दासानी यांच्यासोबत विवाह करणार होती. आणि त्यांना वाटतं होतं की या किसिंग सीनमुळे त्यांच्या विवाहात कोणतीही अडचण येऊ नये. किंवा या सीनचा वाईट परिणाम त्यांच्या नात्यावर पडू नये. आणि विचाराने भाग्यश्री त्रस्त होती. आणि किसिंग सीन देण्यासाठी अस्वस्थ दिसत होती. सलमान सीन द्यायला तयार होता. मात्र भाग्यश्रीने नकार दिला होतं. आणि तिची ही परिस्थिती सलमानने बरोबर हेरली होती. सलमानला लक्षात आलं की ती खुपचं दबावात आहे. (अवश्य वाचा: ‘शुभ्रा’चा संसार मोडण्यासाठी रचला जाणार कट, ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत ट्विस्ट ) तेव्हा सलमानला जाणीव झाली की अभिनेत्रींना असे सीन देण्यास किती अडचणी येतात. किती दबावाला सामोरं जावं लागतं. आणि तेव्हा सलमानने मनाशी ठरवलं की आपल्या सह-अभिनेत्रीला कधीही अवघडल्यासारखं वाटू द्यायचं नाही. आणि तेव्हापासून त्याने ‘नो किसिंग’ ही पॉलिसी अवलंबली होती. सलमान खानचा बहुचर्चित ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होणार आहे.