मुंबई, 27 ऑक्टोबर : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी एक आवश्यक असे कागदपत्र आहे. कोणतेही महत्त्वाचे बँकेतील आर्थिक व्यवहार किंवा अगदी आपलं पर्सनल काम असेल तिथेही पॅन कार्ड (PAN Card) आधारकार्ड (Aadhaar Card) असणं बंधनकारक आहे. ही दोन कागदपत्रं तुमच्याजवळ नसतील तर कदाचितच तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. ही कागदपत्रं व्यक्ती हयात असताना लागतात, पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचा काय संबंध येऊ शकतो का? किंवा या मृत व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर तर होणार नाही ना ? असं मनात सतत घालमेळ सुरु असते. मग अशा व्यक्तींच्या या ओळखपत्रांच नेमकं काय करावं ?
मृत्यूनंतर पॅन कार्डचे काय करावे ?
आपलं पॅनकार्ड हे बँक खात्यांना जोडलं गेलेलं असतं. शिवाय बँकेतील कोणतेही अन्य काम आपल्या पॅनकार्ड आणि आधार कार्ड शिवाय होतच नाही. पण मुख्यतः पॅनकार्ड बँक खाती, डिमांट खाती, आयकर रिटर्न, इनकम टॅक्स रिटर्नसाठी आवश्यक असते.
क्रिप्टो करन्सीच्या नादात होतेय फसवणूक! 6 महिन्यांत तब्बल दोन लाख खाती ब्लॉक
त्यामुळे, अशी सर्व खाती जिथे पॅन कार्ड अनिवार्यपणे आवश्यक आहे, ती पूर्णपणे बंद होईपर्यंत सुरक्षित ठेवावी. उदाहरणार्थ, आयकर रिटर्न भरण्यापासून आयटी विभागाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयटीआर दाखल करताना पॅनकार्ड ठेवले पाहिजे. मात्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या त्या कालावधीत आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. महत्त्वाचं म्हणजे , पॅनकार्ड बंद करण्यापूर्वी संबंधित मृत व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत की नाही, याची दक्षता करून घेतली पाहिजे.
पॅनकार्ड ( PAN Card ) असे करा सरेंडर..
मृत व्यक्तीचे पॅन कार्ड बंद करण्यासाठी, त्या व्क्तीच्या आप्तांपैकी एका प्रितिनिधीला पॅन कार्ड सरेंडर साठी अर्ज करून द्या.
लाखाचे 12 लाख फक्त 18 महिन्यात! तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
अर्जामध्ये नाव, पॅन क्रमांक, मृत व्यक्तीची जन्मतारीख आणि मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत यासोबत पॅन कार्ड जमा करा.
आधारकार्ड रद्द कसे कराल?
बऱ्याचदा व्यक्ती हयात असली तरी त्याच्या आधारकार्डचा गैरपवापर केला जातो. पण मग व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा गैरवापर होणार नाही का? यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी ते तातडीने रद्द करणे गरजेचे असते. आधार कार्ड रद्द करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया किंवा अर्ज करावयाची गरज नाही. त्यामुळे जर एखादा व्यक्ती मृत झाल्याची माहिती कोणत्याही देवाणघेवाण डेटाबेसमध्ये असेल तर ती माहिती त्वरित थांबवावी. त्यामुळे मृत व्यक्तीचे आधार सरेंडर केल्यास किंवा मृत्यू प्रमाणपत्राशी लिंक केल्यास त्या आधारकार्ड व्यक्तीला मृत्यूनंतर त्याचा गैरवापर होण्यापासून रोखता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Mumbai Indians, Mumbai News, Pan card