मराठी बातम्या /बातम्या /मनी /लाखाचे 12 लाख फक्त 18 महिन्यात! 'या' शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय?

लाखाचे 12 लाख फक्त 18 महिन्यात! 'या' शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय?

Borosil Renewables शेअर्सने गेल्या 1 महिन्यात 45 टक्के रिटर्न्स दिले आहेत. एप्रिल 2020 मध्ये शेअर 1400 टक्क्यांनी वाढून 509.70 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

Borosil Renewables शेअर्सने गेल्या 1 महिन्यात 45 टक्के रिटर्न्स दिले आहेत. एप्रिल 2020 मध्ये शेअर 1400 टक्क्यांनी वाढून 509.70 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

Borosil Renewables शेअर्सने गेल्या 1 महिन्यात 45 टक्के रिटर्न्स दिले आहेत. एप्रिल 2020 मध्ये शेअर 1400 टक्क्यांनी वाढून 509.70 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

मुंबई, 21 ऑक्टोबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करून सर्वांना पैसे कमवायचे आहेत. मात्र योग्य स्टॉक निवडणे मोठं कठीण काम आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत बक्कळ कमाई करुन दिली आहे. बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables) शेअर देखील त्यातीलच आहे.भारतात सोलार ग्लास (Solar Glass) बनविणारी एकमेव कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. बोरोसिल रिन्यूएबल्सच्या शेअर्सने गेल्या 1 महिन्यात 45 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

द इकोनॉमिक्स टाईम्सशी बोलताना शेअर बाजारातील तज्ज्ञांनी म्हटलं, सरकारने नुकत्याच केलेल्या सुधारणा आणि देशातील वीज संकट यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. इक्विटी गुंतवणूकदार आता पारंपारिक ऊर्जेला पर्यायी ऊर्जा स्रोतांसह बदलण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

इक्विटीमास्टर, वरिष्ठ रिसर्च अ‌ॅनालिसिस्ट ऋचा अग्रवाल यांनी द इकोनॉमिक टाईम्सला सांगितलं की, देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सौर ऊर्जा व्यवसायासाठी अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या आहेत. यामुळे, ग्रीन एनर्जी थीमला आता गती मिळत आहे. येत्या काळातही या कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहतील अशी अपेक्षा आहे.

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; पाहा Top Gainer-Top Looser शेअर्स

गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स

एप्रिल 2020 मध्ये, बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेअर्स 33.6 रुपयांच्या रेंजवरून 1400 टक्क्यांनी वाढून 509.70 रुपयांपर्यंत पोहोचले होते. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मात्र, बोरोसिलच्या शेअर्सने लोअर सर्किट गाठली आहे. त्याच्या किमती आता त्यांच्या पीकपासून 10 टक्के कमी झाल्या आहेत.

Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स

बोरोसिल रिन्युएबल्समध्ये गुंतवणूक कधी करावी?

बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडमध्ये 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले आणि त्याचे शेअर 446.80 वर आहेत. बोरोसिलच्या शेअर्सने गेल्या 1 वर्षात 333 टक्के रिटर्न दिला आहे. इक्विटी 99 चे सह-संस्थापक राहुल शर्मा म्हणाले की, बोरोसिलने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 200 कोटी उभारले आहेत. कंपनीला आपली सोलार ग्लास उत्पादन क्षमता 450 टन प्रतिदिन वरून 955 टन प्रतिदिन करायची आहे. त्यामुळे बोरोसिलचे शेअर्स वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु सध्याच्या लेव्हलवर शेअर खरेदी करण्याची शिफारस करत नसल्याचे शर्मा म्हणाले.

First published:

Tags: Investment, Money, Share market