Home /News /explainer /

SBI Home Loan: सोप्या पद्धतीने मिळवा एसबीआयचे गृहकर्ज, एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

SBI Home Loan: सोप्या पद्धतीने मिळवा एसबीआयचे गृहकर्ज, एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी कर्ज (How to Apply for SBI Home Loan) पुरवठादार असून बँकेने आजवर 30 लाख कुटुंबांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर जाणून घ्या एसबीआयच्या गृहकर्जाविषयी तपशीलवार माहिती

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 सप्टेंबर: एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी कर्ज (How to Apply for SBI Home Loan) पुरवठादार असून बँकेने आजवर 30 लाख कुटुंबांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. ग्राहकांना परवडणारी घरे सहजपणे उपलब्ध व्हावी आणि आवडीचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी एसबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे. बँकेद्वारे त्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार गृह कर्ज दिले जाते. त्यात नेहमीचे गृह कर्ज (SBI Regular Home Loan), सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय प्रिव्हिलेज गृह कर्ज (SBI Privilege Home Loan for government employees), सैनिक आणि संरक्षण विभागात काम करणाऱ्यांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज (SBI Shaurya Home Loan for army and defense personnel), एबीआय मॅक्सगेन गृह कर्ज (SBI MaxGain Home Loan), एसबीआय स्मार्ट होम (SBI Smart Home), सद्य ग्राहकांसाठी टॉप- अप कर्ज (SBI Top-up Loan for existing customers), एसबीआय एनआरआय गृह कर्ज (SBI NRI Home Loan), मोठ्या रकमेच्या कर्जासाठी एसबीआय फ्लेक्सी पे गृह कर्ज (SBI FlexiPay Home Loan for loan of higher amount), स्त्रियांसाठी एसबीआय हर घर गृह कर्ज (SBI HerGhar Home Loan) यांचा समावेश आहे. एसबीआय गृहकर्जाची वैशिष्ट्ये आणि फायदे >> कमी व्याज दर >> शून्य प्रक्रिया शुल्क >> छुपे किंवा प्रशासकीय शुल्क नाही >> स्त्री कर्जदारांसाठी व्याजात सवलत >> क्रेडिट स्कोअरशी जोडलेले अशाप्रकारचे पहिलेच गृह कर्ज >> पूर्व परतफेडीवर दंड नाही >> दैनंदिन कमी होणाऱ्या थकबाकीवर व्याज >> ओव्हरड्राफ्टवरही गृह कर्ज हे वाचा-Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र एसबीआय गृह कर्ज व्यवसाय आकार – रू. 5.05 लाख कोटी एसबीआय गृह कर्ज बाजारपेठेतील शेयर - 34.77 टक्के गृह कर्ज कालावधी - 3 ते 30 वर्ष व्याज दर – एसबीआयतर्फे क्रेडिट स्कोअरशी जोडलेले गृह कर्ज कितीही रक्कम असली, तरी केवळ ६.७० टक्क्यांत दिले जाते. एसबीआय गृह कर्ज कॅल्क्युलेटर – हा बेसिक कॅल्क्युलेटर ईएमआय, मासिक व्याज आणि प्रती महिना कमी होणारी थकबाकी मूळ रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या मदतीने कॅल्क्युलेट करून देतो. ग्राहकांना त्यांच्या गृह कर्जाची रक्कम, वर्ष, व्याज दर (6.70 टक्के) इत्यादी भरून ईएमआयचा आकडा काढता येऊ शकतो. https://homeloans.sbi/calculators यावर क्लिक करुन तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. रू. 50 लाखांच्या आणि 20 वर्ष कालावधीच्या गृह कर्जासाठी ईएमआय कॅल्क्युलेशनचे इलस्ट्रेशन (प्रातिनिधिक स्वरुप)- ऑनलाइन अर्ज – ग्राहकांना पुढील लिंकवर क्लिक करून गृह कर्जासाठी अर्ज करता येईल, आवश्यक तपशील भरून, पात्रता तपासता येईल तसेच कर्जाचा अंदाज जाणून घेता येईल: https://onlineapply.sbi.co.in/personal-banking/home-loan?se=SBI-Microsite&cp=Homeloan&Ag=SBI-Microsite घरबसल्या  योनो एसबीआयच्या माध्यमातून गृह कर्ज मिळवता येईल >> योनो अकाउंटवर लॉग इन करा. >> होम पेजवर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या मेन्यूवर (तीन लाइन्स) क्लिक करा. >> लोन्सवर क्लिक करा >> होम लोन्सवर क्लिक करा >> जन्मतारीख देऊन पात्रता तपासा >> तुमच्या उत्पन्न स्त्रोताची माहिती द्या >> तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न भरा >> इतर कर्जाची माहिती >> मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम तपासा आणि पुढे जा >> इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा >> तुम्हाला रेफरन्स क्रमांक मिळेल आणि एसबीआय एक्झक्युटिव्ह तुमच्याशी लवकरच संपर्क करतील. हे वाचा-क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करायची आहे?, हे आहेत सर्वात टॉपचे Apps कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे >> एम्प्लॉयर ओळखपत्र >> कर्ज अर्ज पूर्णपणे भरलला कर्जाचा अर्ज आणि 3 पासपोर्ट आकाराचे फोटो >> ओळखपत्र पुरावा (कोणताही एक) पॅन/पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना/मतदार ओळखपत्र >> निवासस्थान/पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) टेलिफोन बिल/विजेचे बिल/पाणी बिल/पाइप्ड गॅस बिल किंवा पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना/आधार कार्ड मालमत्तेची कागदपत्रे >> बांधकामाची परवानगी (आवश्यकता असेल तिथे) >> विक्रीसाठी नोंदणीकृत करार (केवळ महाराष्ट्रासाठी)/वाटप पत्र/विक्रीसाठी मुद्रांकित करार >> भोगवटा प्रमाणपत्र (जर तुम्ही मालमत्ता हलवण्यासाठी तयार असाल तर) >> शेयर प्रमाणपत्र (केवळ महाराष्ट्रासाठी), देखभालीचे बिल, विजेचे बिल, मालमत्ता कर पावती >> मंजूर योजनेची प्रत (झेरॉक्स ब्लूप्रिंट) आणि बिल्डरचा नोंदणीकृत विकास करार, कनव्हेयन्स डीड (नव्या मालमत्तेसाठी) >> पेमेंटच्या पावत्या किंवा बिल्डर/विक्रेत्याला पैसे भरल्याचे दर्शवणारे बँक खात्याचे स्टेटमेंट खात्याचे स्टेटमेंट >> अर्जदाराच्या सर्व बँक खात्यांची गेल्या 6 महिन्यांतील स्टेटमेंट्स >> यापूर्वी इतर बँक/कर्जपुरवठादार यांच्याकडून कर्ज घेतलेले असल्यास एका वर्षाचे कर्ज खात्याचे स्टेटमेंट >> पगारदार अर्जदार/सह- अर्जदार/गॅरेंटर यांच्या उत्पन्नाचा पुरावा >> पगाराची स्लिप किंवा गेल्या 3  महिन्यांतील पगाराचे प्रमाणपत्र >> गेल्या २ वर्षांतील फॉर्म 16 ची प्रत किंवा गेल्या 2 आर्थिक वर्षांतील प्राप्ती कर परताव्यांची प्राप्ती कर खात्याची अधिकृत प्रत, >> पगारदार नसलेले अर्जदार/सह- अर्जदार/गॅरेंटरासाठी उत्पन्नाचा पुरावा >> व्यवसाय पत्त्याचा पुरावा >> गेल्या ३ वर्षांतील ताळेबंद आणि नफा व तोटा खाते >> व्यवसाय परवान्याचे तपशील (किंवा तत्सम) >> टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए, लागू होत असल्यास) >> पात्रता प्रमाणपत्र (सीए, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी) हे वाचा-कोरोना काळात नोकरी गेली? चिंता नको, कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय एसबीआयतर्फे उपलब्ध केली जाणारी विविध प्रकारची गृह कर्ज उत्पादने >> नेहमीचे गृह कर्ज >> एसबीआय गृह कर्ज थकबाकी हस्तांतर >> एसबीआय हर घर गृह कर्ज >> एसबीआय एनआरआय गृह कर्ज >> एसबीआय फ्लेक्सी पे गृह कर्ज >> एसबीआय प्रिव्हिलेज गृह कर्ज >> एसबीआय शौर्य गृह कर्ज >> एसबीआय प्री- अप्रुव्ह्ड गृह कर्ज >> एसबीआय रिअलिटी गृह कर्ज >> एसबीआय स्मार्ट होम टॉप- अप कर्ज >> एसबीआय योनो इन्स्टा होम टॉप अप कर्ज >> एसबीआय कॉर्पोरेट गृह कर्ज >> एसबीआय पगारदार नसलेल्यांसाठी गृह कर्ज >> एसबीआय ट्रायबल प्लस >> एसबीआय अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) >> एसबीआय रिव्हर्स मॉर्गेज कर्ज >> एसबीआय कमर्शियल रियल इस्टेट (सीआरई) गृह कर्ज >> एसबीआय मालमत्तेवरील कर्ज >> एसबीआय हरित गृह कर्ज >> एसबीआय मॅक्सगेन >> एसबीआय सुरक्षा
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan, SBI, SBI bank

    पुढील बातम्या