Home /News /money /

Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र

Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र

पेन्शनर्सना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँकेत जाऊन वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Annual Life Certificate) सादर करावं लागतं. सर्टिफिकेट जमा न केल्यास पेन्शन रोखली जाऊ शकते.

    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: समाजातील विविध वर्गांचे काम कोरोना काळात हलके व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारं काम करत आहे. नागरिकांची विविध कामं सध्या घरातूनच होतील या व्यवस्थेकडे सर्वांचा कल आहे. दरम्यान केंद्र सरकारने आता 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पेन्शनर्सना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँकेत जाऊन वार्षिक जीवन प्रमाणपत्र  (Annual Life Certificate) सादर करावं लागतं. सर्टिफिकेट जमा न केल्यास पेन्शन रोखली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांना आता हे सर्टिफिकेट जमा करण्यासाठी बँकेपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. आता  इंडिया पोस्‍ट पेमेंट्स बँकेचे (India Post Payments Bank)  1.89 लाख टपाल सेवक हे प्रमाणपत्र त्यांच्या घरून घेऊन बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करतील. केंद्र सरकारच्या मते, पोस्ट ऑफिसमध्ये 1.36 लाखांहून अधिक डेस्कवर वार्षिक जीवन प्रमाणपत्रे जमा केली जाऊ शकतात. त्याच वेळी, पेंशनधारकाच्या वतीने नियुक्त अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले जीवन प्रमाणपत्र वैध असेल. तसेच, पेन्शनधारक पोर्टलद्वारे घरी बसून वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. 20 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की पेन्शनधारकांना स्वतः बँकेला भेट देण्याची गरज नाही. पूर्वी हे प्रमाणपत्र दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सादर करावे लागत असे, आता ते नोव्हेंबर महिन्यात जमा केले जाते. हे वाचा-Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान स्वाक्षरीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांची यादी तयार मंत्रालयाच्या माहितीनुसार, सीपीएओने जारी केलेल्या योजना पुस्तिकेनुसार पेन्शनधारांना घरबसल्या प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. योजना पुस्तकानुसार, वार्षिक जीवन प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एमईआयटीवायच्या सहकार्याने नोव्हेंबर 2020 मध्ये पेन्शनधारकांसाठी हा उपक्रम सुरू केला. पोस्टमनच्या मदतीने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी डोअर स्टेप सेवा मिळते. यासाठी, विभागाने देशभरात पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या नेटवर्कचा वापर केला आहे. ते डिजिटल स्वरुपात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा घरोघरी पोहोचवतात. हे वाचा-Good News! स्वस्तात खरेदी करा स्वस्त:चं घर, 10 वर्षात निचांकी आहे व्याजदर कशाप्रकारे मिळवाल या सुविधेचा फायदा? >> या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पेन्शनर्सन सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून Postinfo App डाउनलोड करा >> डीओपीपीडब्ल्यू ने 12 सरकारी बँकांच्या शाखेत देखील वार्षिक जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा दिली आहे. >> पेन्शनर्स doorstepbanks.com आणि dsb.imfast.co.in/doorstep/login चा देखील वापर करू शकतात. >> 18001213721, 18001037188 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून देखील तुम्ही सुविधेचा लाभ घेऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pension

    पुढील बातम्या