Home /News /money /

कोरोना काळात नोकरी गेली? चिंता नको, कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय

कोरोना काळात नोकरी गेली? चिंता नको, कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय

आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाच्या (business) कल्पना सांगणार आहोत, जिथे काहीच गुंतवणूक (investment) न करता व्यवसाय सुरू करता येईल.

नवी दिल्ली 24 सप्टेंबर : कोरोना (Corona) काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या (jobs) गेल्या. अशा कठीण काळात नोकरी मिळवणंही मुश्कील झालं आहे. तुमचीही नोकरी गेली असेल तर पैसे कसे मिळतील याचा विचार करणं गरजेचं झालं आहे. काही नवीन व्यवसाय सुरू करूनही तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाच्या (business) कल्पना सांगणार आहोत, जिथे काहीच गुंतवणूक (investment) न करता व्यवसाय सुरू करता येईल. हा व्यवसाय आधार कार्ड (Aadhar card) संबंधित आहे. तुम्हाला माहितीच आहे की सध्याच्या काळात आधार कार्ड किती महत्वाचं आहे. आधारचा वापर बँक खात्यापासून पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वत्र केला जातो. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्याला आधार कार्ड अत्यंत काळजीपूर्वक ठेवावं लागतं. आधारमध्ये काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UIDAI च्या फ्रँचायझीकडे जावं लागतं. हा फ्रँचायझीचा व्यवसाय (franchise business) तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला आधी आधार कार्ड फ्रँचायझी घ्यावी लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स घ्यावं लागेल. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. Good News! स्वस्तात खरेदी करा स्वस्त:चं घर, 10 वर्षात निचांकी आहे व्याजदर आधार कार्ड फ्रँचायझी मिळवायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला UIDAI ने घेतलेली परीक्षा पास करावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला फ्रँचायझीचा परवाना मिळेल. यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून नोंदणी करावी लागेल. असा करावा अर्ज - आधार फ्रँचाइजी परवाना घेण्यासाठी NSEIT च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action वर जा. - इथं Create New User वर क्लिक करा. क्लिक केल्यावर नवीन फाईल उघडेल. - यामध्ये तुम्हाला शेअर कोड टाकण्यास सांगितलं जाईल. शेअर कोडसाठी, तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करावं लागेल. - डाऊनलोड केल्यानंतर XML फाइल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड होतील. - अर्ज करताना तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. - युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या फोनवर आणि ई-मेल आयडीवर येतील. - आयडी आणि पासवर्डद्वारे आधार टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनच्या पोर्टलवर सहज लॉग इन करू शकता. यानंतर, Continue चा पर्याय तुमच्या समोर येईल, त्यावर क्लिक करा. - एक फॉर्म तुमच्या समोर उघडेल. मागितलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर आपला फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा. - तुम्ही सर्व माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही ते पुन्हा तपासा. - त्यानंतर फॉर्म सबमिट करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करून पुढे जाऊ शकता. Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या मेनूवर जाऊन पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल. ज्यामध्ये पेमेंट केल्यानंतर Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. तिथून तुम्हाला चलन पावती डाउनलोड करून ती प्रिंट करावी लागेल. सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर आपल्याला 1 ते 2 दिवस वाट पाहावी लागेल. त्यानंतर वेबसाइटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. इथं आपल्या जवळचं केंद्र निवडा. या केंद्रावर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र मिळेल. हे प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट करा. आता तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार आहात. व्यवसाय करा आणि करा कमाई.
First published:

Tags: Small business, Small investment business

पुढील बातम्या