• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • केवळ 100 रुपयांपासून सुरु करु शकता क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक, हे आहेत टॉपचे Apps

केवळ 100 रुपयांपासून सुरु करु शकता क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक, हे आहेत टॉपचे Apps

शेअर बाजारात अधिक जोखीम असल्यानं सरसकट सर्वसामान्य लोक त्याकडे वळत नाहीत, तसंच या क्रिप्टोकरन्सीबाबत आहे. याविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज, भीती आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: अगदी झटपट श्रीमंत बनवणाऱ्या क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) या व्हर्च्युअल अर्थात आभासी चलनाबाबत (Virtual Currency) जगभरात सतत चर्चा सुरू असते. त्यामुळे क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) हा शब्द आता सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे, मात्र सर्वसामान्य लोकांना याबाबत फार सखोल माहिती नाही. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे प्रमाणही अत्यल्प आहे. ज्याप्रमाणे शेअर बाजारात अधिक जोखीम असल्यानं सरसकट सर्वसामान्य लोक त्याकडे वळत नाहीत, तसंच या क्रिप्टोकरन्सीबाबत आहे. याविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज, भीती आहे. गेल्या काही वर्षात आपल्या देशातही क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होत असून वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीज, क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आणि विविध अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत. बिटकॉइन हे क्रिप्टोकरन्सीमधील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. त्याचबरोबर इथेरियम, डोगेकोइन अशा अनेक क्रिप्टोकरन्सीज उपलब्ध असून त्यात अगदी सहज गुंतवणूक करता येते. तर कॉन्सविच, कॉइनएफसीएक्स, वजीरएक्स ही भारतातील लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंज आहेत. वजीरएक्स, कॉईनस्वीच कुबेर, युनोकॉईन, कॉईनडीसीएक्स ही अ‍ॅप्स लोकप्रिय आहेत. ती वापरण्यासाठी अत्यंत सुलभ असून, यात अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेची गुंतवणूक करता येते.

कोरोना काळात नोकरी गेली? चिंता नको, कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय

 आज तक डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये (Cryptocurrency Exchange) वजीरएक्स (WazirX ) हे नाव सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजद्वारे रुपया, डॉलर, बीटूसी आणि पीटूपीद्वारे गुंतवणूक करता येते. वजीरएक्सचे स्वतःचे WRX हे कॉइनही आहे. तर कॉईनस्वीच कुबेर (Coin Switch Kuber) या अ‍ॅपवर व्यवहार करण्यासाठी तुम्हाला आधी केवायसी (KYC-Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मोबाईल नंबरसह अकाउंटची नोंदणी करता येते. या अ‍ॅपवर 100 पेक्षा जास्त क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
1000 रुपये होणार LPG Gas Cylinder ची किंमत? सब्सिडीबाबत सरकारची अशी आहे योजना
युनोकॉईन (Unocoin) हेही एक लोकप्रिय अ‍ॅप असून, त्याचा यूजर इंटरफेस अगदी सोपा आहे. युनोकॉईन द्वारे युझर्स केवळ 1 हजार रुपये जमा करू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. हे अ‍ॅप आयडी किंवा पासकोडने लॉक करता येते. तर कॉईनडीसीएक्स (CoinDCX) अ‍ॅपद्वारे 200 पेक्षा जास्त ट्रेड कॉईन खरेदी करता येतात किंवा विकता येतात. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल. तो टाकून आपल्याला अकाउंट सुरू करता येते.

Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान; वाचा सविस्तर

आपल्या देशात 80 लाख लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असल्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये एकूण 173 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 20 हजार नवीन गुंतवणूकदार सामील झाले असल्याचे आढळले आहे.
Published by:Pooja Vichare
First published: