मुंबई, 10 जुलै- आयसीसी वर्ल्ड कप २०१९ चा पहिला उपांत्य फेरीतील सामना भारत आणि न्युझीलंडमध्ये होत आहे. काल पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. मात्र आज हा सामना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळण्यात येणार आहे. काल न्युझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बॉलिवूड स्टार टीम इंडियाला आपल्या अनोख्या पद्धतीने पाठिंबा देताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपले फोटो आणि खास मेसेज पाठवून विराट सेनेला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. सध्या तो स्ट्रीट डान्स 3 या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यातही त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याने इंडियाचं टी-शर्ट घातलेलं दिसतं. यात त्याच्यासोबत डान्सर धर्मेश आणि राघवही दिसत आहेत. हे सर्वच टीम इंडियाला चिअर करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना वरुणने लिहिले की, ‘टीम इंडिया तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.’
याशिवाय टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता करण वाहीनेही भारतीय संघाला सोशल मीडियावर पाठिंबा दाखवला आहे. करणनेही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं की, ‘मी तिथे थांबू शकलो असतो तर…’ यात त्याने टीव्ही अभिनेत्री आशा नेगीलाही टॅग केलं आहे.
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला होता. भारताने या मैदानावर पाकिस्तान आणि वेस्टइंडीजला हरवलं होतं. मात्र या मैदानावर याआधी झालेल्या पाच सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी घेणाऱ्या संघाला विजय मिळवता आला आहे. World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव ‘मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खान लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’ या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर