जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’

लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’

लग्नाच्या आठ वर्षांनंतर या अभिनेत्याच्या घरी आली ‘नन्ही परी’

ही बातमी शेअर करण्याचा काही खास प्लॅन नव्हता. जेव्हा सांगावसं वाटलं तेव्हा आम्ही सर्वांना सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जुलै- प्रसिद्ध टीव्ही अभिनेता बरुण सोबतीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याच्या पत्नीने पशमीनने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर बरुणच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आनंदाचं मुख्य कारण म्हणजे लग्नाच्या आठ वर्षांनंतर बरूण णि पशमीनच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. बरूणने अजूनपर्यंत सोशल मीडियावर याबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी पशमीनचे बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्टीमध्ये बरुण आणि पशमीनसोबत त्यांचे जवळचे मित्र-मैत्रीणी दिसत होते. बरुणच्या घरात आनंदाचं वातावरण आधीपासूनच होतं. पण आता मुलीच्या येण्याने त्यांचा आनंद द्वीगुणीत झाला असेल यात काही शंका नाही. बरुणने पशमीन गरोदर असल्याची बातमीही फार उशीरा शेअर केली होती. यावर स्पष्टीकरण देताना बरुण म्हणाला होता की, त्याला ही बातमी शेअर करण्याचा काही खास प्लॅन नव्हता. जेव्हा सांगावसं वाटलं तेव्हा आम्ही सर्वांना सांगितलं. बेबॉ शॉवर खूप सुंदर पद्धतीने साजरं झालं. लोकांचं तुमच्यासाठीचं असलेलं प्रेम अनुभवणं नेहमीच सुखावणारं असतं. बरुणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर स्टार प्लसवरील श्रद्धा या मालिकेतून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने दिल मिल गये, बात हमारी पक्की है, इस प्यार को क्या नाम दूं यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. स्टार प्लसच्या याच शोने बरुणला टीव्ही स्टार केलं. सिनेमांमध्ये काम करण्यासाठी त्याने टीव्हीमधून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. मैं और मिस्टर राइट या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो अनेकदा टीव्ही, सिनेमे आणि डिजीटलमध्ये काम करताना दिसतो. या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार अक्षय कुमारच्या Mission Mangalचा टीझर पाहून फॅन म्हणाले, साहोसोबत रिलीज नको करू वर्ल्डकपनंतर तुमच्यासाठी आहे फक्त Entertainment Entertainment Entertainment जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात