या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार

या अंधश्रद्धेमुळे आयुष्यभर अविवाहित राहिले संजीव कुमार

पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन बायपास सर्जरी केली होती. पण त्यानंतरही त्यांच्या तब्येतीत फारसा सुधार आला नाही.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै- बॉलिवूड अभिनेते संजीव कुमार यांचं सिनेकरिअर तर सर्वोत्तमच होतं. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, त्यांचं खासगी आयुष्यही कोणत्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं. संजीव यांनी मोठ्या पडद्यावर नानाविध व्यक्तिरेखा साकारल्या. पण त्यांच्या आयुष्यात एका गोष्टीची उणीव नेहमीच राहिली. ती उणीव म्हणजे कुटूंबाचं सुख.

संजीव यांच्या कुटुंबात मुलाच्या जन्माच्या 10 वर्षांनंतर वडिलांचा मृत्यू अटळ होता. संजीव यांच्या आजोबा, वडील आणि भावासोबतहीच घटना घडली होती. हेच पाहत संजय यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेता होता. बॉलिवूडच्या या ठाकुरने कधीही लग्न केलं नाही, पण आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं. दत्तक घेतलेला मुलगा जेव्हा 10 वर्षांचा झाला तेव्हा संजय कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. congenital heart condition ने संजीव यांचा जन्म झाला होता.

पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन बायपास सर्जरी केली होती. पण त्यानंतरही त्यांच्या तब्येतीत फारसा सुधार आला नाही. 6 नोव्हेंबर 1985 मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर संजीव यांचे 10 हून जास्त सिनेमे प्रदर्शित झाले. 1993 मध्ये प्रोफेसर की पडोसन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

संजीव यांच्या पुरस्कारांबद्दल बोलायचे झाले तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आपल्या सिनेकरिअरमध्ये रोमँटिक, ड्रामा आणि थ्रिलर अशा अनेक प्रकारचे सिनेमे केले.

अक्षय कुमारच्या Mission Mangalचा टीझर पाहून फॅन म्हणाले, साहोसोबत रिलीज नको करू

वर्ल्डकपनंतर तुमच्यासाठी आहे फक्त Entertainment Entertainment Entertainment

जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

First published: July 9, 2019, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading