जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / उर्फी जावेदसाठी हातात पोस्टर घेऊन इंदूरच्या महिला रस्त्यावर, नेमकं काय आहे प्रकरण?

उर्फी जावेदसाठी हातात पोस्टर घेऊन इंदूरच्या महिला रस्त्यावर, नेमकं काय आहे प्रकरण?

उर्फी जावेदमुळे इंदूरच्या महिला रस्त्यावर

उर्फी जावेदमुळे इंदूरच्या महिला रस्त्यावर

उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर अर्धनग्न कपडे घालून वावरत होती. मात्र आता महिलाच उर्फीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : आपल्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे उर्फी जावेद सातत्यानं चर्चेत आहे.  सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात.  उर्फीवर अनेकदा याबाबत आक्षेप देखील घेण्यात आला आहे. तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. उर्फीनं या सगळ्यांना मोठ्या हिंमतीनं तोंड दिलंय. मात्र तिने  तिची फॅशन स्टाइल काही सोडलेली नाही. उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर अर्धनग्न कपडे घालून वावरत होती. मात्र आता महिलाच उर्फीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. उर्फी विरोधात इंदूरमध्ये महिलांनी आंदोलन केलं. काय होतं या आंदोलनाचं स्वरूप पाहूया. उर्फीच्या कपड्यांच्या स्टाइलवरून इंदूरमध्ये चांगलाच गदारोळ झाला.महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी उर्फीच्या फोटोला फुल्ली मारून ते फोटो हातात घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, गाडीतून प्रवास करणाऱ्या सगळ्यांना लोकांना दाखवले. उर्फीचे अशा प्रकारचे कपडे घालणं तुम्हाला आवडतं का? ही नग्नता चांगली आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले.  अशा प्रकारचं आंदोलन इंदूरमध्ये करण्यात आलं आहे. या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  या आंदोलकांनी आंदोलन सुरू करण्याआधी उर्फीला सद्बुद्धी मिळाली म्हणून मंदिरात जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली. हेही वाचा -  3 हजाराचा ड्रेस, 11 हजाराचा मंडप, अमृता-अनमोलनं इतक्या कमी पैशात कसं केलं लग्न आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना नेटवर्क 18 मीडियानं काही प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही आमचे जुने कपडे एकत्र करून माझ्या भावांच्या माध्यमांतून उर्फीपर्यंत पोहोचवणार आहे. उर्फी कधीच नवीन आणि पूर्ण कपडे घालत नाही. म्हणून आम्ही तिला जुने फाटलेले कपडे देणार आहोत”.

News18लोकमत
News18लोकमत

तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका महिलानं प्रतिक्रिया देत म्हटलं की, “उर्फी जावेद या देशाची मुलगी आहे या नात्यानं आम्ही तिला सन्मान करतो. पण ती ज्या प्रकारचे कपडे घालते त्याचं आम्ही जराही समर्थन करत नाही. उर्फी जरी एक अभिनेत्री आहे तर तिने तिच्यात असलेल्या कलेचं योग्यरित्या प्रदर्शन करणं हे तिच्यासाठी अधिक चांगलं असेल. आम्ही आज मुंबईपासून इतक्या दूर असलेल्या इंदूर शहरातून हे बोलत आहोत पण उर्फीला देशातील कोनाकोपऱ्यात ओळखलं जातंय पण ते तिच्या चुकीच्या कामांमुळे ओळखलं जातंय”. इंदूरच्या या आंदोलक महिनांनी घरोघरी जाऊन उर्फी विरोधात आंदोलन केलं. महिलांना जागृक करण्याचं काम केलं. त्यांचे जुने कपडे त्यांनी उर्फीसाठी गोळा केलेत. त्या म्हणतात, अशा प्रकारची नग्नता समाजासाठी आणि आमच्या मुलांवर वाईट प्रभाव टाकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात