मुंबई, 17 मे- बॉलिवूडची सर्वात क्यूट आणि सर्वात साधी अभिनेत्री अमृता रावने नुकतेच पती आरजे अनमोलसोबत तिच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे. ‘कपल ऑफ थिंग्ज’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात तिनं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनोळखी किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यासोबतच दोघांचे या पुस्तकाच जे नाव आहे त्याच नावानं यूट्यूब चॅनेलही आहे. हल्ली ते ‘येही वो जगह है’ नावाची मालिका चालवत आहेत. ज्यामध्ये ते आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से आणि ठिकाणांशी संबंधित आठवणी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी 15 मे 2014 रोजी लग्न केले होते. पुण्यातील कात्रज येथील इस्कॉन मंदिरात नऊ वर्षांपूर्वी दोघांनी गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला खर्च किती आला होता आणि अमृताने परिधान केलेला ड्रेसची किंमत किती होती याबद्दल त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे. त्यांच्या लग्नासाठी 1 लाख 50 हजार रुपये खर्च आला. या खर्चात लग्नाचे कपडे, लग्नाचे ठिकाण, प्रवास आणि इतर खर्चाचा समावेश होता. वाचा- चाळीशी ओलांडली तरी एकट्याच राहतात या अभिनेत्री; आजही केलं नाहीये लग्न अमृता-अनमोलची लग्नाचे कपडे होते फक्त तीन हजार रुपयांची अमृता राव म्हणाली की, लग्नासारख्या खास प्रसंगी अनमोल आणि तिला कोणतेही डिझायनर कपडे घालायचे नव्हते. लग्नाचे पारंपारिक कपडे तीन हजार रुपयांना खरेदी करण्यात आले होते, लग्नस्थळासाठी 11 हजार रुपये देण्यात आले होते. अमृता राव पुढे म्हणाली, ‘लग्न म्हणजे प्रेम, असं आमचं नेहमीच मत आहे. पैसा ही दाखवण्याची वस्तू नाही. आमच्या लग्नात आमचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र असावेत एवढीच आमची इच्छा होती.
अमृता राव पुढे म्हणाली की, आम्ही लग्नावर जास्त खर्च केला नाही आणि पण आम्हाला त्यातून आनंद मिळाला. तर आरजे अनमोल म्हणाला, ‘आमचं लग्न म्हणजे आमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक आहे. आणि आम्हाला ते साध्या पद्धतीनं करायचे होते. जर आमच्या लग्नातून लोकांना त्यांच्या बजेटनुसार लग्न करण्याची प्रेरणा मिळाली तर आम्हाला आनंद होईल.