उर्फी जावेद नुकतीच रणवीर अलाहाबादीयाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेक खुलासे केले.
कारण विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली की, 'पूर्वी तिच्याकडे पैसे नव्हते, पण आता आहेत. उर्फीने एका बॉयफ्रेंडचाही उल्लेख केला ज्याच्यासोबत तिचे ब्रेकअप झाले होते.
अभिनेत्रीने सांगितले की, तिने त्याच्या नावाचा टॅटू काढला होता, ज्यामुळे तिची आई आणि बहीण तिची खूप चेष्टा करतात.
उर्फी म्हणाली, “माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याच्या नावाचामी टॅटू काढला आहे. 15 ऑक्टोबर रोजी मी हातावर टॅटू काढला. मी पण खुश होते. त्याने पण माझ्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढला होता. पण सगळ्यांना त्याने वडिलांची बर्थ डेट आहे असं सांगितलं.'
'एवढंच नाही तर तो इतर मुलींसोबत फ्लर्ट करायचा. जेव्हा मी माझा टॅटू झाकून घेतला तेव्हा तो चिडला. मग आमचं ब्रेकअप झालं. आताही माझी आई आणि सर्वजण माझी चेष्टा करतात त्या टॅटूमुळे.'
तसंच उर्फीने सांगितलं 'मला कोणासोबतही प्रेम व्हायचं. माझं अनेक वेळा ब्रेकअप झालंय. पण आता मी तशी नाही.'
याचं कारण सांगत ती म्हणाली, 'कारण आता माझ्याकडे पैसे आणि काम आहे. तेव्हा दोन्ही नव्हतं त्यामुळे मी असं वागले.'