Home /News /entertainment /

विकीला सारा सोबतची बाईक राईड महागात; RTO कारवाईच्या तयारीत

विकीला सारा सोबतची बाईक राईड महागात; RTO कारवाईच्या तयारीत

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) इंदूरमध्ये चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. यावेळी विकीने सारासोबत केलेली बाईक सवारी चांगलीत महागात पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 1 जानेवारी - अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) इंदूरमध्ये चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. यावेळी विकीने सारासोबत केलेली बाईक सवारी चांगलीत महागात पडण्याची शक्यता आहे. विकीने ज्या दुचाकीवरून फेरफटका मारला त्या दुचाकीचा नंबर एका एक्टिवाचा निघाला आहे. सोशल मीडियावर शुटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक्टिवाचा मालक थेट पोलिसांत पोहोचला. त्यामुळे आता विकी आणि दिग्दर्शकांच्या अडचणी वाढणार आहेत. विकी आणि साराच्या लुका-छिपी-२ या आगामी चित्रपटाचे इंदूरमध्ये शुटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या सेटवरून काही व्हिडीओ व्हायरल झाले. ज्यामध्ये सारा अली खान आणि विकी कौशल बाईकवरून जात आहेत. यामध्ये दोघेही अतिशय साध्या लूकमध्ये दिसून येत आहेत. परंतु, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका एक्टिवाच्या मालकाने आपला नंबर वापरल्याची तक्रार थेट RTO कडे केली आहे. त्यावर RTO ही हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगत पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत. वाचा-सोनमने पती आनंदसोबत LIPLOCK करत केलं New Year सेलिब्रेशन नंबरच्या मूळ मालकाची नाराजी चित्रपटाच्या सेटवर शुटिंगसाठी वापरलेल्या गाडीचा नंबर एका एक्टिव्हाचा असल्याचे पुढे आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या नंबरच्या गाडीचे मालक जयसिंह यादव नाराज झाले आहेत. मला याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. मी MP-09 UL 4872 या नंबरची एक्टिवा 25 मे 2018 मध्ये खरेदी केली होती. चित्रपट निर्मात्यांनी विनापरवाना माझ्या एक्टिवाचा नंबर वापरला. परंतु, या गाडीने जर एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार?, असा प्रश्न गाडीच्या मूळ मालकाने केला आहे. यावर इंदूरचे RTO जितेंद्र रघुवंशी यांनी अशाप्रकारे गाडीचा नंबर वापरणे चुकीचे ठरवले आहे. कोणीही अशा प्रकारे दुसऱ्याच्या गाडीचा नंबर वापरू शकत नाही. वाहन मालकाने परवानगी दिली तरीही नंबर वापरणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती RTO रघुवंशी यांनी दिली आहे. वाचा- 'RRR'च्या फॅन्ससाठी बॅड न्यूज, रिलीज डेटबाबत निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय दरम्यान, या शूटमध्ये विकीने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातला आहे आणि सोबतच वर मफलर घेतला आहे. तर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या गद्य सध्या साडीत दिसून येत आहे. यावरून चित्रपटात दोघेही एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिरेखा साकारत असल्याचं दिसून येत आहे. सारा आणि विकी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या नव्या जोडीला पाहण्यासाठी चाहतेही फारच उत्सुक आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Sara ali khan, Vicky kaushal

    पुढील बातम्या