जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनम कपूरचा नवीन वर्षावर पाहायला मिळाला रोमँटिक अंदाज, पती आनंदसोबत केलं खुलेआम LIPLOCK

सोनम कपूरचा नवीन वर्षावर पाहायला मिळाला रोमँटिक अंदाज, पती आनंदसोबत केलं खुलेआम LIPLOCK

सोनम कपूरचा नवीन वर्षावर पाहायला मिळाला रोमँटिक अंदाज, पती आनंदसोबत केलं खुलेआम LIPLOCK

सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या बॉलिवूडपासून लांब असली तरी तिच्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. सोनमने नवीन वर्षाचे रोमँटिक पद्धतीने स्वागत केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जानेवारी- सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या बॉलिवूडपासून लांब असली तरी तिच्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या सोनम पतीसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. सोनम सतत सोशल मीडियावर तिचे फोटो तसेच व्हिडिओ व तिच्याशी संबंधीत लहान मोठी अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनमने पती आनंद आहुजासोबत (Anand Ahuja) नवीन वर्षाचे स्वागत खास अंदाजात केले आहे. सोनमने पती आनंद आहूजासोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं खुलेआम पती आनंदसोबत लिपलॉक केले आहे. आता तिचा हा फोटो सोशल मीडिावर व्हायरल होत आहे. सोनम कपूर(Sonam Kapoor) तिचा पती आनंद आहुजावर(Anand Ahuja) खूप प्रेम करते. हे प्रेम तिने सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त केले आहे. सोनमने नवीन वर्षाचे रोमँटिक पद्धतीने स्वागत केले आहे. सोनमने आनंदसोबत लिपलॉक करून नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. वाचा- जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुकेश? 200 कोटीच्या घोटाळ्यातील आरोपीचा दावा सोनमने सोशल मीडिया अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही फोटो हे रोमँटिक कॅंडल लाईट डिनरचे आहेत. या फोटोंमध्ये दोघांनीह काळ्या रंगाची कपडे घातले आहे. सोनमने ड्रेससोबत डायमंड ज्वेलरी घातली आहे. दोघांचीही जोडी खूप सुंदर दिसत आहे.

जाहिरात

सोनमने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे ती, माझ्या आयुष्यातील प्रेम ..तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! तो फक्त #एवरीडेफेमोमिना नाही तर प्रत्येक वर्षी अमेजिंग आहे आणि त्याच्यासोबतच मला प्रत्येकवेळी नवीन वर्ष साजरे कराचे आहे.2022 मध्ये तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य, सुख लाभो अशी मी आशा करतो, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. वाचा- Big News: ‘जर्सी’फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण सोनम कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोक या पोस्टवर कमेंट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. सोनम सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसते. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ताज्या वक्तव्यावर त्यांनी नुकतीच जोरदार टीका केली होती. या पोस्टमुळे देखील सोनम चर्चेत आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात