'RRR'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावरू यासंदर्भात माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्व लोकांचे हित लक्षात घेऊन आम्हाला आमचा चित्रपट पुढे ढकलण्याशिवाय काहीच पर्याय नाही. आमच्यावर न थक्कता प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनपूर्वक आभार. यासोबत त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये म्हटले आहे ती, आम्ही खूप प्रयत्न केले मात्र शेवटी परस्थिती आमच्या हातात नाही. कारण काही राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्याकडे देखील कोणाताच पर्याय नाही. योग्य वेळी आम्ही परत येऊ. वाचा- Bold & Beautiful क्रिती सेनन; अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटवर खिळल्या नजरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी खूप पैसा लावला होता. मागच्या काही दिवसांपासून सिनेमाचे प्रमोशोन जोरदार सुरू आहे. अनेक हिंदी शोमध्ये यामधील कलाकार प्रमोशनासाठी हजेरी लावत आहेत. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेट संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.Keeping the best interests of all the involved parties in mind, we are forced to postpone our film. Our sincere thanks to all the fans and audience for their unconditional love. #RRRPostponed #RRRMovie pic.twitter.com/JlYsgNwpUO
— RRR Movie (@RRRMovie) January 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Tollywood