मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विकी- कतरिनाच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांची अशी केली होती व्यवस्था; अलिशान रूमचा Video पाहून डोळे चमकतील

विकी- कतरिनाच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांची अशी केली होती व्यवस्था; अलिशान रूमचा Video पाहून डोळे चमकतील

Vicky-Katrina Wedding Venue: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची सगळीकडे चर्चा आहे.

Vicky-Katrina Wedding Venue: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची सगळीकडे चर्चा आहे.

Vicky-Katrina Wedding Venue: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची सगळीकडे चर्चा आहे.

मुंबई, 12 डिसेंबर - Vicky-Katrina Wedding Venue: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची सगळीकडे चर्चा आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. कतरिना आणि विकी विक्की (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) यांनी स्वतः त्यांच्या सात फेऱ्यांपासून ते हळदी-मेंदी आणि संगीत समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांच्या घरातील मंडळी फुलटू मस्ती करताना दिसत आहेत. त्याचवेळी, विकी-कतरिनाच्या लग्झरी वेडिंग व्हेन्यू सिक्स सेन्स फोर्ट बरवारडाबाबतबरवाड़ा (Six Senses Fort Barwara) बरीच चर्चा झाली होती. आता विकी कौशलची मावस बहिण डॉ उपासना वोहरा आणि तिचा नवरा अरुणेंद्र कुमार यांनी चाहत्यांना विकी-कतरिनाचे पाहुणे ज्या खोल्यांमध्ये थांबले होते त्यांची एक झलक दाखवली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा रंगलेली आहे.

विकी आणि कतरिनाने 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्नगाठ बांधली. अरुणेंद्र कुमारने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या सिक्स सेन्स फोर्ट बर्वराडाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आलिशान रुम्सपासून वॉशरूमपर्यंतची झलक दाखवताना दिसत आहे.

वाचा : कतरिना-विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोत दिसलं फक्त प्रेम..

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या बाल्कनीतूनही एक सुंदर नजारा पाहता येतोय. सिक्स सेन्स फोर्ट बरवडा येथे विकी-कतरिनाच्या लग्नाला आलेले पाहुणे ज्या खोल्यांमध्ये थांबले होते त्या खोल्यांमध्ये चार-पोस्टर कॅनोपी बेड आणि कोरीवकाम असलेली लाकडी सजावट होती. याशिवाय खोलीच्या आत एक मोठा चेजिंग करण्यासाठी जागा देखील होती.

वाचा : वरमाला गळ्यात पडताच विकी असं काही म्हणाला, ज्यामुळे कतरिना लागली रडू

एवढेच नाही तर अरुणेंद्र आणि उपासना यांनी व्हिडिओमध्ये मोशन सेन्सर टॉयलेटही दाखवले. ज्याची किंमत ६ लाख सांगितली जात आहे. या टॉयलेटची खास गोष्ट म्हणजे रिमोटच्या मदतीने त्याची सेटिंग्ज बदलता येतात. व्हिडीओमध्ये दोघांनी किल्ल्याच्या आतील इतर भागही दाखवला आणि लग्नात केलेल्या व्यवस्थेबद्दलही सांगितले.

" isDesktop="true" id="642747" >

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कुटुंब, काही जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील त्यांच्या जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. पण, लग्नाच्या शेवटपर्यंत दोघांनीही ते खाजगी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोघांच्या लग्नाचे फोटोही शेअर केल्यानंतरच समोर आले आहेत. आता दोघेही इंडस्ट्रीतील त्यांच्या खास मित्रांसाठी मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal