मुंबई, 20 जून : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची मुंबई पोलिसांनी जवळपास 11 तास चौकशी केली. त्यामध्ये तिने सुशांतच्या शेवटच्या दिवसांबद्दल, त्यांच्या रिलेशनबद्दल आणि नैराश्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. पण त्यांच्या जॉइंट कंपन्यांबाबत काही माहिती दिली नाही. पोलीस तपासात सुशांत आणि रियाच्या एकत्रित कंपन्यांविषयीची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या तीन कंपन्यांपैकी दोनात रिया डायरेक्टर होती.
रियाने या आर्थिक व्यवहारांविषयी पोलिसांना अद्याप कुठलीही माहिती आपणहून दिलेली नाही. त्यामुळे पोलीस या दोघांच्या आर्थिक व्यवहारांविषयी माहिती काढण्यासाठी रियाने पुन्हा एकदा चौकशी करू शकतात.
भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने त्याच्या आतापर्यंतच्या कमाईतला मोठा हिस्सा स्वतः सुरू केलेल्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्या तीनपैकी दोन कंपन्यांमध्ये रिया त्याची पार्टनर होती. एका कंपनीत तर रियाबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसुद्धा डायरेक्टर असल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही गुंतागुंत नव्हती ना याची खातरजमा करण्यासाठी पोलीस सुशांतच्या चार्टर्ड अकाउंटच्या संपर्कात आहेत.
सुशांतच्या तथाकथित गर्लफ्रेंडचे महेश भट्ट यांच्याबरोबरचे PHOTO व्हायरल
पोलिसांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची गुरुवार शुक्रवारी तब्बल 10- 11 तास चौकशी केली होती. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रियाने पोलिसांना सुशांतशी ओळख कशी झाली इथपासूनची सगळी माहिती दिली आहे. त्याबरोबरच 6 जूनलाच आपण सुशांतचं घर सोडलं होतं, असंही या अभिनेत्रीने सांगितलं.
EXCLUSIVE : सुशांत आत्महत्या प्रकरण, रियाच्या चौकशीत 10 तासांमध्ये काय घडलं?
सुशांत आणि रियाची ओळख 2013 साली झाली होती. त्या वेळी सुशांत 'यशराज'चा चित्रपट शुद्ध देसी रोमान्स करत होता आणि रिया चक्रवर्ती टमेरे डॅडी की मारुती' नावाच्या चित्रपटासाठी काम करत होती. त्या दोघांच्या चित्रपटांचे सेट एकमेकांसमोर होते. तिथेच दोघांची पहिली भेट झाली आणि मैत्री झाली. त्या वेळी सुशांत रिलेशनशिपमध्ये होता.
त्यानंतर वेगवेगळ्या पार्टी आणि इतर समारंभांना रिया आणि सुशांत भेटत होते. सुशांत फार काही वैयक्तिक गोष्टी शेअर करत नसे. 2017-18 मध्ये एका प्रॉडक्शन हाऊससाठी काम न करण्याचा त्याने निर्णय घेतला आणि रियानेसुद्धा त्यांचं काम सोडलं, असं रियाने सांगितलं.
सुशांतने यशराजबरोबर दोन चित्रपट केले होते आणि शेखर कपूर यांच्या 'पानी' चित्रपटातही तो होता. त्या चित्रपटाला यशराजकडून निधी मिळणार होता. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
रियाने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला मानसिक त्रास होता आणि तो त्यासाठी डॉक्टरांकडेही गेला होता. पण गेले काही दिवस तो डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नव्हता. तो आपले ताण-तणाव फार शेअर करत नसे. अशा वेळी तो एकटा राहणं पसंत करे. पुण्याजवळ पवना इथे त्याचं फार्म हाऊस होतं. तिथे जाऊन तो राहात असे.
नेपोटिझमवरून सुरू आहे वाद, पण सुशांतनं यावर आधीच शोधला होता उपाय, पाहा VIDEO
6 जूनला सुशांत पुन्हा डिप्रेशनमध्ये होता. त्याने रियाला मला एकटं राहू दे, असं सांगितलं. घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्यामुळे रियासुद्धा यावर काही न बोलता निघून गेली. थोड्या दिवसात सुशांत पुन्हा ठीक होईल. त्याला स्वतःसाठी वेळ हवा होता. एकांत हवा होता. तो देण्यासाठी आपण त्याच्या घरातून बाहेर पडतो, असं रियाने पोलिसांना सांगितलं. 6 जूनला सुशांतचं घर सोडल्यानंतर अचानक 14 जूनला त्याच्या आत्महत्येची बातमीच मिळाली आणि धक्का बसला, असंही रियाने सांगितलं.
संकलन - अरुंधती
अन्य बातम्या
कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य
'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने जारी केला VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.