जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नेपोटिझमवरून सुरू आहे वाद, पण सुशांतनं यावर आधीच शोधला होता उपाय, पाहा VIDEO

नेपोटिझमवरून सुरू आहे वाद, पण सुशांतनं यावर आधीच शोधला होता उपाय, पाहा VIDEO

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 14 जूनला आत्महत्या करत जीवन संपवलं पण सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता हे कोणीच नाकारू शकत नाही. टीव्हीपासून सुरुवात केलेल्या सुशांतनं, बॉलिवूडमध्ये 'एम एस धोनी', 'छिछोरे' सारखे हिट सिनेमा दिले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 14 जूनला आत्महत्या करत जीवन संपवलं पण सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता हे कोणीच नाकारू शकत नाही. टीव्हीपासून सुरुवात केलेल्या सुशांतनं, बॉलिवूडमध्ये 'एम एस धोनी', 'छिछोरे' सारखे हिट सिनेमा दिले होते.

सोशल मीडियावर नेपोटिझमवरून नवा वाद सुरू आहे. पण स्वतः सुशांतचं मात्र नेपोटिझमबाबत फार वेगळं मत होतं

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडलं आहे. सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या नंतर बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर नेपोटिझमवरून नवा वाद सुरू झाला आहे. एकीकडे अनेकांनी नेपोटिझममुळे सुशांतकडे बॉलिवूडनं दुर्लक्ष केलं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे स्वतः सुशांतचं मात्र नेपोटिझमबाबत फार वेगळं मत होतं हे पाहायला मिळत आहे. त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो नेपोटिझमवर आपलं मत मांडताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीतल्या काही लोकांवर असा आरोप लावला जात आहे की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या आधारावर फक्त स्टार किड्सनाच संधी दिली जाते आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आउटसायडर्ससोबत हे लोक भेदभाव करतात. असं म्हटलं जातंय की, सुशांत सुद्धा याच नेपोटिझमची शिकार झाला होता. त्यामुळे सध्या हा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे. पण यावर कोणताही उपाय निघालेला नाही. पण सुशांतनं मात्र यावर आधीच उपाय सुचवला होता. ‘अंकिता लोखंडेला तो नेहमी…’ सुशांतबाबत डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

सध्या सोशल मीडियावर सुशांतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहे. ज्यात त्याला नेपोटिझमवर प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर देताना तो म्हणतो. नपोटिझम फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी आहे. आपण ते बदलू शकत नाही. नेपोटिझम कायमच राहणार आहे आणि त्याचं काही होऊ शकत नाही. पण जर त्यात जाणून-बुजून खरं टॅलेंट वर येऊ दिलं नाही तर मात्र समस्या निर्माण होऊ शकते. एक दिवस असा येईल की इंडस्ट्रीचा पूर्ण ढाचाच कोसळून जाईल. जोपर्यंत त्या टॅलेंटला वाव मिळत आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. सुशांतच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की, नेपोटिझम तोपर्यंत समस्या होऊ शकत नाही जोपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये खऱ्या टॅलेंजला वाव मिळण्यापासून रोखलं जात नाही. पण जर असं नाही झालं तर मात्र सर्व गोष्टी एक दिवस बिघडून जाऊ शकतात. वडिलांची लाडाची लेक होती माधुरी, शेवटच्या क्षणापर्यंत होती सोबत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात