जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य

कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य

कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य

सुशांतचा मित्र संदीप सिंहनं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यानं अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : बऱ्याच काळापासून सुशांत सिंह राजपूतच्या बेस्ट फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या संदीप सिंहनं त्याच्या सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यानं अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ही पोस्ट त्यानं अंकिताला उद्देशून लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सुशांत आणि अंकितासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतच्या लाइफमध्ये अंकिताला किती महत्त्व होतं हे सुद्धा त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टसोबत त्यानं अंकिता आणि सुशांतसोबतचा होळीचा फोटो शेअर केला आहे. संदीपनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, प्रिय अंकिता, प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत माझ्या मनात हा विचार येत राहतो की, आपण आणखी थोडा प्रयत्न केला असता तर त्याला थांबवू शकलो असतो. जेव्हा तुम्ही वेगळे झालात त्यावेळी सुद्धा तू त्याला यश मिळावं म्हणून प्रार्थना करत होतीस. तुझं प्रेम खरं होतं. हे खूप खास होतं. आजही तुझ्या घराच्या नेमप्लेटवरून तू सुशांतचं नाव काढून टाकलेलं नाही. ते सगळ्याच दिवसांची मला खूप आठवण येते आहे. जेव्हा आपण तिघंही लोखंडवालामध्ये एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. असे अनेक क्षण आपण जगलो जे आठवल्यावर माझं मन रडत आहे. एकत्र जेवण बनवणं, एकत्र जेवणं, मटण-भात, आपली लॉन्ग ड्राइव्ह, कधी लोणावळा तर कधी गोव्याला जाणं, एकत्र खेळलेली होळी, ते हसणं, आयुष्यातले ते कठीण दिवस, जेव्हा आपण सगळे एकत्र होतो आणि तू आमच्यात सर्वाधिक सक्रिय होतीस. वडिलांची लाडाची लेक होती माधुरी, शेवटच्या क्षणापर्यंत होती सोबत

जाहिरात

संदीपनं पुढे लिहिलं, ती केवळ तुच होतीस जी सुशांतच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत होती. एवढंच नाही तर मला आजही वाटतं, की तुम्ही दोघंही एकमेकांसाठी बनलेले होता. तुम्ही दोघं सर्वासाठी खऱ्या प्रेमाचं उदाहरण होता. हे सर्व आठवल्यावर मला रडू येत आहे. मी त्याला आता कसं परत आणू, मला त्याला परत आणायचं आहे. तुला मालपुवा आठवतो का? सुशांत कसा एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या आईकडे मटण करी मागत असे. मला माहित आहे फक्त ती तुच होतीस जी त्याला वाचवू शकत होती. 6 जूनला नेमकं काय झालं की रिया चक्रवर्तीने सुशांतचं घर सोडायचं ठरवलं? संदीपनं लिहिलं, ‘माझी खूप इच्छा होती की, तुमचं दोघांचं लग्न व्हावं, जसं तुम्ही दोघांनी ठरवलं होतं. तु त्याला नक्कीच वाचवलं असतं, जर त्यानं तुला इथे राहू दिलं असतं तर. तू त्याची गर्लफ्रेंड होतीस, त्याची पत्नी होतीस, त्याची आई होतीस आणि त्याची बेस्ट फ्रेंड सुद्धा तुच होतीस. आय लव्ह यू अंकिता, मला आशा आहे की यानंतर मी तुला गमवणार नाही. मला ते सहनही होणार नाही.’ ‘सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं’; कंगनाने जारी केला VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात