Home /News /entertainment /

'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने VIDEO पोस्टमधून दिले पुरावे

'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने VIDEO पोस्टमधून दिले पुरावे

अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा मूव्ही माफियांवर हल्लाबोल केला आहे.

    मुंबई, 19 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant singh rajput) आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) पुन्हा आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं, असं कंगनाने म्हटलं आहे. तिनं या व्हिडीओत पुरावेही दिलेत. मूव्ही माफियांच्या गँगमधील पत्रकारांनीही आपल्याला खूप त्रास दिला. ज्याप्रमाणे आपल्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या त्याचप्रमाणे सुशांतबाबतही पसरवल्या. असं कंगनाने या व्हिडीओत म्हटलं आहे. तिनं सुशांतचे वडील, त्याची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दिलेल्या प्रतिक्रिया आणि आधीच्या काही मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे.
    कंगना म्हणाली, "काही बातम्यांमध्ये माझं थेट नाव घेतलं नाही. तर कुरळे केस आहेत, मनालीची आहे, जिनं राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे, अशा पद्धतीने वर्णन करून माझ्याबाबत बातम्या देण्यात आल्या. अशाच पद्धतीने सुशांतबाबतही बातम्या होत्या. सुशांत सिंह राजपूत ट्रक ड्रायव्हर वाटतो, शारीरिक संबंध ठेवताना तो स्वत:चीच गाणी ऐकतो, एका पार्टीत त्याने स्कॉचचा ग्लास एका दिग्दर्शकाच्या डोक्यावर मारला, सुशांतने आपल्या सह अभिनेत्रीवर बलात्कार केला आहे, तो मीटू अंतर्गत जेलमध्ये जाऊ शकतो. अशा बऱ्याच बातम्या त्याच्याविरोधात छापण्यात आल्या" हे वाचा - Suicide or Murder: सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर लवकरच मुव्ही, पोस्टर झळकलं "अशा पद्धतीच्या कित्येक खोट्या गोष्टी मीडियामार्फत पसरवण्यात आल्या. मूव्ही माफियाच्या गँगमधील पत्रकारच हे लिहितात. माझ्यासोबत असं झालं आहे. ज्यावेळी मी त्यांच्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या चार लोकांनी एक गँग तयार केली आणि माझ्या फिल्म फ्लॉप करण्याच्या तयारीला लागले. जवळपास तीन हजार पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी मला त्रास दिला", असा आरोग कंगनाने केला आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही सिनेमा- विवेक
    First published:

    Tags: Entertainment news, Kangana ranaut, Sushant sing rajput

    पुढील बातम्या