सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हे नाव अधिक चर्चेमध्ये आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.
रियाने विराट कोहली बाबत काही महिन्यांपूर्वी देखील एक प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी ती चर्चेत आली होती. तिला जेव्हा विचारण्यात आले होते की सर्वात हॉट खेळाडू कोण वाटतो, तर तिने विराटचे नाव घेतले होते. तो तेव्हा शतक करतो त्यावेळी आणखी हॉट दिसतो अशी प्रतिक्रिया रियाने दिली होती.
आता रिया आणि एका कारणासाठी चर्चेत आहे. ते म्हणजे तिचे 71 वर्षीय महेश भट्ट यांच्याबरोबर काही फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोंवरून महेश भट्ट यांना देखील ट्रोल केले जात आहे. महेश भट्ट आणि रियाचे हे फोटो 2 वर्षांपूर्वीचे आहेत. सोशल मीडियावर या फोटोंवरून उलट सुलट चर्चा केली जात आहे
18 जून रोजी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत रियाची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्याच दरम्यान तिचे महेश भट्ट यांच्याबरोबरचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान सुशांत आणि रिया यावर्षी लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. ते दोघं काही काळासाठी एकत्र देखील राहत होते. मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी रियाने त्याचे घर सोडले
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्येआधी जे दोन शेवटचे फोन कॉल केले होते, त्यापैकी एक नाव रियाचे होते. म्हणजेच रिया त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांपैकी होती असा तर्क लावण्यात येत आहे.