'सतत नका दोष काढू! घरात राहून दिवाळीसारखी पणती लावायचीय...' शशांक केतकरची प्रतिक्रिया व्हायरल

'सतत नका दोष काढू! घरात राहून दिवाळीसारखी पणती लावायचीय...' शशांक केतकरची प्रतिक्रिया व्हायरल

'फक्त घरात राहून पणत्या लावायच्या आहेत, कँडल मार्च काढू नका', असंही शशांकने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 9 वाजता व्हिडिओ संदेश दिला. रविवारी, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करून मेणबत्त्या लावा, पणत्या लावा असा संदेश मोदींनी दिला, त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. कुणी मोदींच्या वेगळ्या विचारांचं स्वागत केलं, तर काहींनी हा दिखाऊपणा आहे, असं म्हणत टीका केली. अभिनेता शशांक केतकर याने पंतप्रधानांना नावं ठेवणाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. "सतत नावं ठेवू नका. दिवाळीत पणती लावतो, तसंच फक्त 9 मिनिटं पणती, दिवा, मोबाईलचा फ्लॅश लावायचा आहे. घरातच राहून. सतत दोष काढू नका", असं मत शशांकने मांडलं आहे.

त्याचा हा स्टेटस मेसेज व्हायरल झाला होता. 'फक्त घरात राहून पणत्या लावायच्या आहेत, कँडल मार्च काढू नका', असंही शशांकने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर विविध सामाजिक-राजकीय विषयांवर शशांक अधून मधून व्यक्त होत असतो. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुजय डहाके यांनी टीव्ही मालिकांमधल्या जातीयवादाबद्दल मत व्यक्त केलं होतं आणि मालिकांमध्ये फक्त ब्राह्मण नायिकांनाच घेतात, असा आरोप केला होता. त्यावरही शशांकने प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याची ती फेसबुक पोस्टसुद्धा बरीच व्हायरल झाली होती.

BREAKING - देशात कोरोनाचे बळी वाढले; 24 तासांत 12 मृत्यू, 336 नवे रुग्ण

‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे', असं शशांकने लिहिलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता व्हिडिओ संदेशातून देशातील जनतेला एकजूट राहण्याचं आवाहन केलं. कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी घरात थांबून लॉकडाउनला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. मोदी म्हणाले, "आपण सर्वांनी मिळून कोरोनाला आव्हान द्यायचंय. 130 कोटी देशवासीयांची शक्ती दाखवू या. मला तुमची फक्त 9 मिनिटं द्या", असं म्हणत मोदींनी आवाहन केलं. तुम्ही एकटे नाही, 130 कोटी लोक तुमच्यासारखेच एकत्र आहेत. हे दाखवण्यासाठी 9 मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन मोदींनी केलं.

शशांक केतकरने या आवाहनाचं स्वागत केलं आहे आणि टीकाकारांना सारखा दोष न काढण्याचं आवाहन केलं आहे.

अन्य बातम्या

वडिलांनी LockDownचे नियम पाळले नाहीत म्हणून मुलाने दाखल केला FIR

घटस्फोटाच्या रात्री काय घडलं? मलायका अरोरानं तब्बल 4 वर्षांनंतर केला खुलासा

First published: April 3, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या