Home /News /entertainment /

घटस्फोटाच्या रात्री काय घडलं? मलायका अरोरानं तब्बल 4 वर्षांनंतर केला खुलासा

घटस्फोटाच्या रात्री काय घडलं? मलायका अरोरानं तब्बल 4 वर्षांनंतर केला खुलासा

अरबाजने ह्या लग्नातून का ब्रेक घेतला हे प्रश्न अनुत्तरीत आहे पण मलयाकाच्या एका मुलाखतीमुळे पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या तलाकसंदर्भात चर्चा होत्या. दोघही अखेर 2017 रोजी काडीमोड घेऊन वेगळे झाले. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे हे लग्न मोडलं अशी चर्चा बॉलिवडू आणि फॅन्समध्ये रंगते मात्र अद्याप या तलाकचं खरं कारण समोर आलं नाही. अनेकांच्या मनात अद्यापही अनेक प्रश्न आहेतच. 2017 रोजी दोघही पूर्णपणे वेगळे झाले. सलमान खानचा मोठा भाऊ आणि मलायकाचा पती अरबाजने ह्या लग्नातून का ब्रेक घेतला हे प्रश्न अनुत्तरीत आहे पण मलयाकाच्या एका मुलाखतीमुळे पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. करीना कपूर-खानच्या रेडियो शोदरम्यान मलायका अरोरा आली होती. त्यावेळी मलायकानं पहिल्यांदा अरबाज आणि तिच्यात झालेल्या काडीमोडवर मोठा खुलासा केला आहे. 'हा निर्णय दोघांनी घेतला तेव्हा घरच्यांचं त्यावर काय म्हणणं होतं हेही यावेळी मलायकानं सांगितलं आहे. आम्ही तलाक घेऊन वेगळं होऊ नये असं घरातील प्रत्येकाला वाटत होतं. आम्ही समजून विचार करून शांतपणे निर्णय घ्यावा असं कुटुंबियांचं म्हणणं होतं. मी तलाक घेण्याआधी रात्री माझ्या कुटुंबियांसोबत बसून चर्चा केली. ' हे वाचा-कोरोनाच्या संशयानं केला प्रेमाचा शेवट; वॉर्ड बॉयकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या 'मी घेतलेला निर्णय योग्य आहे का यासंदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यांनी मला विचार तू घेतलेल्या निर्णयावर ठाम आणि स्पष्ट आहेस का? हे माझे लोक आहे त्यांना माझ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची काळजी आहे. त्यामुळे त्यांनी मला विचारलं. माझ्या निर्णयाला कुटुंबीय आणि मित्रांचा पूर्ण सपोर्ट होता. हा निर्णय घेणं कधीही सोपा नव्हतं, जसा तुमच्या आयुष्यातील कोणताही मोठा निर्णय घेणे सोपे नसते तसंच आहे. त्यानंतर कोणा एकावर आरोप केले जाणार आणि बोट दाखवलं जाणार हा मनुष्य स्वभाव आहे हे माहीत असतं आपल्याला. त्यावेळी जी परिस्थिती होती त्यात आम्ही एकमेकांना जास्त दुखवत होतो. त्यापेक्षा वेगळं राहून आपण आनंदात राहून असा निर्णय आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन घेतला.' असं या कार्यक्रमादरम्यान मलायकानं सांगितलं आहे. हे वाचा-मोठी बातमी! पाकिस्ताकडून LOCवर मोठ्या प्रमाणात गोळीबार, 6 जवान जखमी
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या