नवी दिल्ली, 03 एप्रिल : कोरोनामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत ल़ॉकडाउन करण्यात आलं आहे. घरातच बसण्याचं आवाहन केलं असतानाही लोक घराबाहेर जात असल्याचं दिसतं. वडिलांनी लॉकडाउनचं उल्लंघन केल्याबद्दल एका मुलानं त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मुलाने म्हटलं की, माझे वडिल कोरोनाशी लढण्यासाठी असलेल्या नियमांचं पालन करत नाहीत. वडिल लॉकडाउनचं उल्लंघन करत आहेत. ते दररोज रात्री 8 वाजता कोणत्याही कामाशिवाय घरातून बाहेर पडतात आणि रस्त्यावर फिरतात.
दिल्लीत राहणाऱ्या मुलानं म्हटलं की, त्याने वडिलांना किती तरी वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर वसंत कुंज ठाण्याच्या पोलिसांनी वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यानंतर कारवाई सुर केली. मुलगा त्याच्या वडिलांसह रजोकरी भागात राहतो.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत 2300 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. गुरुवारपर्यंत दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 293 वर पोहोचली होती. दिल्लीत मरकज निजामुद्दीनशी संबंधित 1810 लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यातील 536 लोक दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी केली जात आहे. यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
हे वाचा : पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेले 70हून अधिकजण ताब्यात