मुंबई, 24 जानेवारी : सध्या बॉलिवूडमध्ये एका सिनेमाची चर्चा आहे तो म्हणजे शाहरुख खानचा पठाण. 25 जानेवारीला पठाण संपूर्ण देशात प्रदर्शित होत आहे. पठाणचा ट्रेलर आल्यापासून सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सिनेमानं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग केलं आहे. शाहरुख खान देखील सिनेमाचं दणकून प्रमोशन करताना दिसतोय. त्याचं आस्क एसआरके सेशन जोरदार सुरूच आहे तर दुसरीकडे चाहत्यांकडून शाहरुखला मात्र भन्नाट प्रश्न विचारले जात आहेत. शाहरुख देखील त्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं देताना दिसतोय. आधी मन्नत बाहेर उभ्या असलेल्या फॅनला शाहरुखनं बेडवरून उत्तर दिलं होतं. यावेळी फॅननं भन्नाट प्रश्न विचारला आहे.
शाहरुख खान सध्या दणकून पठाण सिनेमाचं प्रमोशन करतोय. अशात तो ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असल्याचं दिसत आहे. ट्विटवर तो सर्वांना रिप्लाय देताना दिसतोय. यानं तो चाहत्यांच्या आणखी जवळ आला आहे. पठाण सिनेमासाठी संपूर्ण थिएटर बुक केलेल्या चाहत्यांचे देखील साहरुखनं आभार मानलेत. शाहरुखचे चाहते त्याचा सिनेमा पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं यावरून समजत आहे. पण एका चाहत्याचा मात्र जरा वेगळाच प्रोब्लेम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानं थेट ट्विट करत शाहरुखकडेच त्याचा उपाय मागितला आहे.
हेही वाचा - 'मन्नत' पूर्ण करण्यासाठी गेटवर उभा राहिला फॅन, शाहरूखने थेट बेडवरूनच दिलं उत्तर
Beta ek hafta ho gaya abhi tak honeymoon nahi kiya!!! Now go see #Pathaan with wife and do honeymoon later… https://t.co/yqmvzQX5Ai
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 24, 2023
शाहरुख सध्या जवळपास सगळ्याच चाहत्यांच्या ट्विटला उत्तरं देताना दिसत आहे. एका चाहत्यानं ट्विट करत म्हटलंय, 'सर लास्ट विक माझं लग्न झालं. आधी हनिमूनला जाऊ की पठाण पाहायला?'. चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं म्हटलं, 'बेटा एका आठवडा झाला पण अजून हनिमून केला नाहीस. आता बायकोबरोबर पठाण बघायला जा आणि नंतर हनिमून कर'. शाहरुखनं दिलेल्या या भन्नाट उत्तरानंतर अनेकांना हसू आवरलेलं नाही. अनेकांनी हे ट्विट शेअर केलं आहे.
पठाण सिनेमा रिलीज होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. रिलीज आधीच पठाण हाऊसफुल्ल झालं आहे. अनेक ठिकाणी 2400 रुपयांना पठाणचं एक तिकिट विकलं जात असतानाही प्रेक्षक तिकिट विकत घेत आहेत. पठाणला टक्कर देण्यासाठी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा रिलीज होणार आहे. कोणता सिनेमा सर्वाधिक कमाई करतो याकडे आता सर्वाचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News