मुंबई, 21 जानेवारी : अभिनेता शाहरुख खान पठाण या सिनेमातून तब्बल 4 वर्षांनी कमबॅक करतोय. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. दररोज हजारो लोक मन्नत बाहेर शाहरुखची वाट पाहत असतात. शाहरुखचा बर्थ डे असो किंवा कोणता सण चाहत्यांना भेटण्यासाठी तो येतोच. शाहरुखला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. शाहरुखला मेसेज करतात. टॅग करतात. आपल्या मेसेजला कधीतरी शाहरुखनं रिप्लाय द्यावा असं प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं. एका चाहत्याची हिच इच्छा शाहरुखनं पूर्ण केली आहे. शाहरुखनं चाहत्याला काय रिप्लाय दिला पाहूया. शाहरुखला भेटण्यासाठी दररोज मन्नतबाहेर अनेक चाहते येत असतात. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण तासंतास मन्नत बाहेर उभे राहतात. असाच एक चाहता शाहरुखला पाहण्यासाठी मन्नत बाहेर उभा होता मात्र शाहरुख काही आला नाही. अखेर त्या चाहत्यानं शाहरुखला घराबाहेरुन सेल्फी पाठवला आणि त्यावर एक नोट लिहिली. जी वाचून शाहरुखला देखील चाहत्याला रिप्लाय द्यावासा वाटला. हेही वाचा - रिलीज आधीच Pathaanहाऊसफुल्ल? आतापर्यंत झालं इतकं अँडवान्स बुकींग मन्नत बाहेर थांबलेल्या चाहत्यानं मन्नत बंगल्याबरोबर फोटो काढून ट्विटरला टाकला. त्या फोटोला, ‘शाहरुख खान मी तुमची वाट पाहत होतो तुम्ही बाहेर का आला नाहीत?’, असं कॅप्शनही दिलं. सोबत रडण्याचे इमोजी देखील शेअर केले. ही पोस्ट शेअर करत मन्नतमधूनच शाहरुखनं रिप्लाय दिलाय. ‘फिलिंग लेझी, अंथरुळातच चिल मारायची आहे’.
पठाण सिनेमाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या 25 जानेवारीला पठाण सिनेमात रिलीज होतोय. शाहरुख खान आणि टीम सिनेमाचं दणक्यात प्रमोशन करताना दिसतेय. प्रमोशनसाठी शाहरूखनं यावेळी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला आहे. ट्विटरवर आस्क SRK सेशन तो सातत्यानं घेत असतो. अनेक प्रश्नांची शाहरुख स्वत: उत्तर देताना दिसतो. पठाण सिनेमा रिलीज होण्याच्या 5 दिवस आधीच सिनेमा हाऊसफुल्ल झाला आहे. मोठ्या प्रमाणात सिनेमाचं अँडवान्स बुकींग करण्यात आलं आहे. फॅन्सनी पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. सिनेमाचं अँडवान्स बुकींगचा विचार करून सिनेमा ओपनिंग कलेक्शनमध्ये 50 कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, पठाणचं एडवान्स बुकींग हे PVRमध्ये 51 हजार इतकं आहे. INOXमध्ये 38,500 इतकं आहे. तर CINEPOLISमध्ये 1,17000इतकं आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणच्या अँडवान्स बुकींगनं सर्वांच्या भुवया उंचावल्यात.

)







