मुंबई, 18 डिसेंबर: अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख आणि दीपिका पादुकोण सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमा येत्या 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमासाठी शाहरूखचे चाहते उत्साही आहेत. मात्र सध्या सिनेमावरून वाद देखील निर्माण झाला आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकिनीवरून हिंदी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणण्यात आलं आहे. बेशरम गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीवर टीका होत असली तरी गाण्यातील शाहरुख मात्र सध्या चाहत्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्यावरून वाद वाढत असून ते प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे किंग खान ‘पठाण’ला यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर 15 मिनिटांचे #asksrk हे सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये कोणीही त्याला प्रश्न विचारू शकत होते. हेही वाचा - बेशर्मचा हॉट लूक पाहून ती म्हणाली व्हॉट्सअॅप नंबर दे; शाहरूखच्या उत्तराची होतेय चर्चा या सत्रादरम्यान, ट्विटर नेटकाऱ्यानी शाहरुख खानवे प्रश्नांचा भडीमार केला. त्याला अनेक प्रश्न विचारले आणि त्यानेही या प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा एका नेटकऱ्याने त्याला चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईबद्दल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की “मला याविषयी फरक पडत नाही, माझं काम तुमचे मनोरंजन करणे आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हे आहे.’ तर दुसरीकडे एका नेटकऱ्याने शाहरुख खानला विचारले की, ‘आम्ही ‘पठाण’ चित्रपट पाहायला का जावे?’
यावर शाहरुख खानने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचंच मन जिंकलं. त्याने चाहत्याच्या या प्रश्नाला मजेशीरपणे उत्तर देत लिहिलं कि, ‘कारण मला वाटतं की तुला हा सिनेमा पाहून मजा येईल.’ या सत्रादरम्यान शाहरुखने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना मजेशीर उत्तरं दिली. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला.
प्रश्न उत्तरांचा या खेळात शाहरुखनं चाहत्यांना फिटनेस टिप्सही दिल्या. एका चाहत्यानं पठाणमधील शाहरुखचे फिटनेस फोटो शेअर केलेत. या फोटोंसह ‘सर तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी मोटिवेशन देत आहात’, असंही म्हटलं. ‘फक्त सुरू करा आणि 7 दिवस करत राहा. तुम्ही यात अडकून पडाल. स्वतःसाठी करा आणि तुम्ही पुढे जात राहाल’, असं शाहरुखनं म्हटलं आहे.
पठाण चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा एक अॅक्शन थ्रिलर असेल, ज्यामध्ये दीपिका पदुकोणशिवाय जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉन या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत आहे, म्हणजे या दोन्ही कलाकारांमध्ये जबरदस्त भांडण होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.