हिमाचल प्रदेशमध्ये शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत असा वेळ घालवतात सारा- कार्तिक

हिमाचल प्रदेशमध्ये शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत असा वेळ घालवतात सारा- कार्तिक

दोघांची जोडी ऑफस्कीन इतकी पसंत केली जात आहे. त्यामुळे बी-टाउनमधली ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जून- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या लव आज कल २ सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. चित्रीकरणादरम्यान सारा आणि कार्तिक वेळातवेळ काढून निसर्गरम्य ठिकाणी फिरत आहेत. लोकांनी त्याला ओळखू नये म्हणून दोघं आपला चेहरा झाकत फिरताना दिसत आहेत. नुकतेच दोघांचे मार्केटमध्ये फिरतानाचे आणि नदी काठी निवांत बसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नदी किनारी निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान फार क्यूट दिसत आहे. दोघांची जोडी ऑफस्कीन इतकी पसंत केली जात आहे. त्यामुळे बी-टाउनमधली ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी ठरत आहे. निर्मात्यांना सारा आणि कार्तिकच्या या हिट जोडीची क्रेझ आपल्या सिनेमांमध्ये वापरायची आहे. इम्तियाज अलीने याचा सर्वातआधी फायदा उचलला. हिमाचलमध्ये आजपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून कार्तिक आणि सारा दोघंही एकमेकांना किती आवडतात हे सांगितलं आहे.

...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

Sunny Leone आता हिंदी सोडून भोजपुरी शिकतेय सनी लिओनी, VIRAL VIDEO

इम्तियाज अली दिग्दर्शित लव आज कल २ सिनेमात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनशिवाय रणदीप हुड्डाचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमाचं मुंबई आणि दिल्लीतलं चित्रीकरण संपलं असून उर्वरित चित्रीकरण हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. साराच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती वरुण धवन सोबत कुली नंबर १ मध्ये काम करणार आहे तर कार्तिक आर्यनही पती पत्नी और वो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी रूप्साने जिंकले 15 लाख रुपये, झाली Super Dancer 3ची विजेती

सारा अली खानने गेल्यावर्षी केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. या सिनेमानंतर ती रणवीर सिंगसोबत सिंबा सिनेमातही दिसली होती. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले होते. सारा अली खान सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीपासूनच चर्चेत होती. स्टार किड्स कसे असतात हे तिच्याकडे पाहूनच कळतं. आता साराचा तिसरा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

First published: June 24, 2019, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading