मुंबई, 24 जून- छोट्या पडद्यावर गेल्या सहा महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेला डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर ३ अखेर शेवटच्या टप्प्यात आला. रविवारी २३ जूनला या शोचा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडला. अनेक दिवसापासून शोचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सुपर डान्सर ३ चं विजेता कोण झालं हे जाणून घेण्याची साऱ्यांचीच उत्सुकता होती. जर तुमचं हा फिनाले शो पाहणं मिस झालं असेल तर आम्ही सांगतो की सहा वर्षांच्या रूप्सा बतब्यालने हा शो जिंकला. रूप्साला ट्रॉफीसोबत १५ लाख रुपयांचा धनादेशही मिळाला. या शोमध्ये रूप्सा सुपर गुरू निशांत भट्टच्या ट्रेनिंगमध्ये होती. रूप्साने तिच्या प्रत्येक परफॉर्मन्समधून प्रेक्षकांं मन जिंकलं. यामुळेच शोमध्ये सर्वात जास्त मतं मिळणारी ती स्पर्धक ठरली होती.
MeTooप्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या 'नाम'वर तिने उठवले प्रश्न
'या' सिनेमातून शाहरुखसोबत पुन्हा एकदा दिसणार श्रेयस तळपदे
रूप्सा जिंकल्यानंतर प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. याचं मुख्य कारण म्हणजे रूप्साने डान्समधील वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये यशस्वी प्रयोग केले. तिच्या डान्सचे फक्त गुरूच नाही तर सारेच दिवाने होते. याशिवाय तिच्या उत्कृष्ट डान्सचं श्रेय गुरू निशांतलाही द्यायला हवं. त्याने रुप्साला प्रत्येक स्टाइल अशाप्रकारे शिकवली की तिच्यासाठी कठीण असं काहीच राहिलं नाही. निशांत आणि रूप्साला एकत्र परफॉर्म करताना पाहणं हे प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती.
रूप्साच्या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य जनताच होती असं नाही तर रेखा, शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ, आलिया भट्ट हे सेलिब्रिटीही तिच्या डान्सचे दिवाने होते. या शोचा उपविजेत्याबद्दल बोलायचे झाले तर तेजस वर्मा या शोचा उपविजेता ठरला. या शोमध्ये टॉप- 5 मध्ये पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाला लोटसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये सोनी वाहिनी तर्फे प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.
या टीव्ही अभिनेत्रीने दिला मुलीला जन्म, पहिल्या मुलीनं केलं अनोखं स्वागत
VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा