...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

एकदा ऐश्वर्याला एका छायाचित्रकाराने अॅश म्हटले त्याचाही त्यांना राग आला होता. असे जया यांचे एक नाही तर अनेक किस्से आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 जून- सुपरस्टार अमिताभ बच्चन स्वतः सोशल मीडियावर सक्रिय असतात. नव्या पिढीला लाजवतील असे ते ट्विटवर दररोज काही ना काही शेअर करून आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या त्यांचा एक फोटो  इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे जो त्यांनी कधी शेअरही केला नव्हता. बिग बी आणि जया बच्चन यांचा जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि जया दोघंही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. अनेक दिवसांनंतर दोघांचा एकमेकांसोबत निवांत क्षण घालवतानाचा फोटो त्यांच्या चाहत्यांनी पाहिला. मात्र काहींना हा फोटो आवडला नाही आणि त्यांनी जया यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

वयाच्या सहाव्या वर्षी रूप्साने जिंकले 15 लाख रुपये, झाली Super Dancer 3ची विजेती

अभिषेक नावाच्या युझरने लिहिले की, 'एवढ्या वर्षांमध्ये या महिलेसोबत नातं टिकवल्याबद्दल बिग बी यांना एक पुरस्कार नक्कीच दिला पाहिजे.' तर प्रतिज्ञाने लिहिले की, 'हा फोटो पाहून आश्चर्य वाटतंय की, जया बच्चन यांनी फोटो काढायला परवानगी तरी कशी दिली.' अबीहा कासमीने लिहिले की, 'मला ही उद्धट महिला अजिबात आवडत नाही.' तर जस्ट पंजाबी या नावाने इन्स्टाग्राम चालवणाऱ्या महिलेने लिहिले की, 'अखेर जया बच्चन यांनी फोटो काढला.'

लग्नानंतर नवऱ्यासोबत भारतात परतली खासदार नुसरत जहां, असं झालं स्वागत

मीडियामध्ये जया बच्चन यांचा राग सर्वश्रूत आहे. त्या अनेकदा फोटो काढताना छायाचित्रकारांवरच रागावतात. त्यामुळेच जया यांच्यावर अशा कमेंट केल्या जातात. एकदा ऐश्वर्याला एका छायाचित्रकाराने अॅश म्हटले त्याचाही त्यांना राग आला होता. असे जया यांचे एक नाही तर अनेक किस्से आहेत. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०१६ मध्ये त्यांनी की अँड का या सिनेमात कॅमिओ केला होता. यानंतर त्या रुपरी पडद्यावर दिसल्याच नाहीत. तर सध्या बिग बी गुलाबो सिताबो सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत.

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

First published: June 24, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या