Home /News /entertainment /

'इब्राहिमने हृतिकप्रमाणे वागावं', सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देताना सैफने दिलं हे उदाहरण

'इब्राहिमने हृतिकप्रमाणे वागावं', सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देताना सैफने दिलं हे उदाहरण

सैफ अली खानचा (Saif Ali Khan) थोरला मुलगा इब्राहम खान (Ibrahim Khan) कधीच लाईमलाईट नसतो. सैफ ला इब्राहिम बद्दल विचारले असता इब्राहीमने सध्या सोशल मीडिया पासून लांबच राहावं असं मत सैफने मांडलं आहे.

    मुंबई , 05 डिसेंबर: अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) धाकटा मुलगा तैमूर अली खान  (Taimur Ali Khan)  नेहमी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय असतो. पण त्याचवेळी सैफचा मोठा मुलगा इब्राहम खान (Ibrahim Khan) मात्र लाइमलाइटपासून लांब आहे. सैफला इब्राहिम बद्दल विचारले असता इब्राहीमने सध्या सोशल मीडिया (Social Media) पासून लांबच राहावं  असं मत खुद्द सैफने मांडलं आहे. एक जबाबदार नवरा किंवा जबाबदार वडील म्हणून सैफ अली खानची ओळख आहे. तो कायमचं आपल्या परिवाराची काळजी घेताना दिसतो. सैफला आता तीन मुलं असून तो लवकरच चौथ्यांदा बाबा होणार आहे. सैफची मुलगी सारा अली (Sara Ali Khan) खानने बॉलिवूडमध्ये  पदार्पण करून दोन वर्षं झाली असून आता इब्रामही देखील बॉलिवूडमध्ये (Bollywood) एंट्री करेल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सैफ आणि इब्राहिमच्या दिसण्यात बरच साम्य असल्याने इब्राहिम जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल तेव्हा त्याची सैफबरोबर तुलना होईलच. सैफला इब्राहिमच्या लाँचिंगबद्दल विचारले असता त्यानं असं उत्तर दिलं की, लाँचिंग हे कायम सरप्राइसिंग असावं. ज्याप्रमाणे हृतिक रोशनने (Hrithik Roshan) काहो ना प्यार है (Kahona Pyar Hai) मध्ये Debut करण्यापूर्वी तो नेमका कोण आहे किंवा हृतिक राकेश रोशन यांचा (Rakesh Roshan) मुलगा आहे हे देखील बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. त्याचप्रमाणे इब्राहिमच लाँचिंग सरप्राइसिंग असावं अशी इच्छा सैफने व्यक्त केली आहे. (हे वाचा-VIDEO: सलमान खानच्या बहिणीला झालं तरी काय? हॉटेलमधल्या डझनभर प्लेट्स फोडल्या) हृतिकने 20 वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं, आता सोशल मीडियाच्या काळात असं लाँचिंग शक्य आहे का? असा प्रश्न सैफला विचाारला असता त्याने असं उत्तर दिलं की, इब्राहिमने पदार्पण करण्यापूर्वी सोशल मीडिया पासून चार हात लांबच राहवं. त्याने तसा सल्लाच इब्राहिमला मुंबई मिररच्या मुलाखतीदरम्यान दिला आहे. (हे वाचा-‘तुझ्यात एवढं टॅलेंट आहे तर अभिनयात वापर ना’ मिक्का सिंहने घेतली कंगनाची शाळा) सैफची मुलगी साराने बॉलीवूडमध्ये केदारनाथ (Kedarnath) या चित्रपटातून Debut केला होता. यामध्ये साराचा सहकलाकार सुशांत सिंह राजपूत होता. गेल्या काही महिन्यापूर्वीच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर साराची देखील ड्रग प्रकरणात NCB कडून चौकशी करण्यात आली होती. म्हणूनच आता इब्राहिमच्या लाँचिंग पूर्वी नवाब सैफ अली खान विशेष खबरदारी घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर नंतर नेपोटिसमच्या (Nepotism) चर्चेला उधाण आल्याने आता  सैफ अली खान  देखील  इब्राहिमला लाँच करताना प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood, Saif Ali Khan, Sara ali khan, Sushant sing rajput, Taimur ali khan

    पुढील बातम्या