जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: सलमान खानच्या बहिणीला झालं तरी काय? हॉटेलमधल्या डझनभर प्लेट्स फोडल्या

VIDEO: सलमान खानच्या बहिणीला झालं तरी काय? हॉटेलमधल्या डझनभर प्लेट्स फोडल्या

VIDEO: सलमान खानच्या बहिणीला झालं तरी काय? हॉटेलमधल्या डझनभर प्लेट्स फोडल्या

सलमानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान-शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती हॉटेलमधील प्लेट्स फोडताना दिसत आहे. नेमका आहे तरी काय हा प्रकार?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 डिसेंबर: एकीकडे सलमान खान (Salman Khan) बिग बॉस 14 (Bigg Boss 14) त्याच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे त्याची बहीण एका व्हिडीओमुळे व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) रेस्टॉरंटमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. आणि ती एकामागून एक प्लेट्स फोडताना दिसत आहे. अर्पिताचा व्हिडीओ दुबईच्या एका रेस्टॉरंटमधील आहे. खरंतर अर्पिता रागात या प्लेट्स फोडत नाहीये तर ती एक अॅक्टिव्हीटी आहे. प्लेट्स फोडताना ती मोठ्याने हसताना दिसत आहे. अर्पिताने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अर्पिताने तिच्या मुलाचा म्हणजे आहिलचा व्हिडीओही शेअर केला आहे. अर्पिता रेटॉरंटमधील प्लेट्स तोडताना दिसत आहे. तर आहिल चक्क घरातल्याच प्लेट्स तोडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अर्पिताने तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी तिने तिचा नवरा आयुषसोबत एक फोटो शेअर करत रोमँटिक पोस्टही केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात