जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘बाई गं तुझ्यात एवढं टॅलेंट आहे तर अभिनयात वापर ना’ मिक्का सिंहने घेतली कंगनाची शाळा

‘बाई गं तुझ्यात एवढं टॅलेंट आहे तर अभिनयात वापर ना’ मिक्का सिंहने घेतली कंगनाची शाळा

‘बाई गं तुझ्यात एवढं टॅलेंट आहे तर अभिनयात वापर ना’ मिक्का सिंहने घेतली कंगनाची शाळा

गायक मिक्का सिंहने (Mika singh) कंगनाची ट्वीटरवरुन शाळा घेतली आहे. सध्या कंगनाविरोधात #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 डिसेंबर: देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. पण कंगना रणौतचा (Kangana Ranaut) याबाबतीतही वेगळाच मुद्दा आहे.  शेतकरी आंदोलनावरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रनौतची गायक मिक्का सिंहनेही (Mika Singh) शाळा घेतली आहे. अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनाच्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मिक्कानेही तिला एक सल्ला दिला आहे. कंगना रणौतने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत जी वक्तव्य केली होती त्याविरोधात तिला कायदेशीर नोटीस येणार अशा चर्चा पसरू लागल्या. यावर बोलताना कंगनाने ट्वीट केलं, ‘फिल्म माफियांनी माझ्यावर अनेक केसेस लावल्या आहेत. जावेद अख्तर यांनीही माझ्यावर एक केस केली. महाराष्ट्र सरकारदेखील माझ्यावर केसेस करतच असतं. आता पंबाजमधील काँग्रेस सरकारने तेच केलं आहे. ही लोकं माझ्यावर केस करुन मला महान बनवणार आहेत. त्याबद्दल धन्यवाद.’ अशाप्रकारचं उपरोधित ट्वीट कंगनाने केलं होतं. कंगनाच्या ट्वीटवर मिक्का सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. मिक्का सिंहने ट्वीट केलं, ‘तुझं टार्गेट नक्की कोण आहे हे तरी समजू दे. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे तर ते अभिनयामध्ये दाखव ना. तुझ्यात अचानक एवढी देशभक्ती कुठून जागी झाली?’

जाहिरात

या ट्वीटसोबतच मिक्काने कंगनाला अजून एक आव्हानही केलं आहे. मिक्का म्हणाला, ‘आम्ही रोज अनेक गरजूंना मदत करत आहोत. ट्वीटवर स्वत:ला वाघिण म्हणवून घेणं सोप्पं आहे. तू निदान 20 लोकांना तरी मदत कर.’

जाहिरात

शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका आजींवर कंगनाने ट्वीट केलं होतं. त्यावरुन ती बरीच ट्रोल झाली होती. सध्या ट्वीटवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात