जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

सैफने २००४ मध्ये पहिली पत्नी अमृता सिंगशी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये त्याने करिनाशी लग्न केलं. करिना आणि सैफला एक मुलगा तैमुर अली खानही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 01 जून- बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला होता. पतौडी कुटुंबाचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यात शर्मिला टागोर, सैफ, करिना, तैमूर, सोहा, इब्राहिम आणि सारा एकत्र दिसत होते. दरम्यान आता सैफ अली खान आणि करिना कपूरचा लग्नातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सैफने शेरवानी घातली आहे तर करिना नवरीच्या पेहरावात आहे. या दोघांसोबत शर्मिला टागोर, सोहा अली खान, सबा अली खान, सारा अली खान आणि इब्राहिम अली खानही दिसत आहेत. या फोटोत सारा आणि इब्राहिम फारच सुंदर दिसत आहेत. त्यावेळी सारा १७ वर्षांची होती तर इब्राहिम ११ वर्षांचा होता. इब्राहिमनेही वडिलांप्रमाणेच शेरवानी घातली होती. जोरदार हवेने ‘या’ अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस

    जाहिरात

    सैफने २००४ मध्ये पहिली पत्नी अमृता सिंगशी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये त्याने करिनाशी लग्न केलं. करिना आणि सैफला एक मुलगा तैमुर अली खानही आहे. जन्मापासूनच तैमुर हा प्रसारमाध्यमांचा लाडका झाला आहे. याशिवाय सारा आणि करिनाचं एकमेकांसोबत चांगलं बॉण्डिंग आहे. मेकअपशिवाय अशी दिसते अक्षय कुमारची अभिनेत्री, एका क्षणात तुम्हीही ओळखू शकणार नाही करण जोहरच्या शोमध्ये साराने स्वतः कबुल केलं होतं की, सैफ आणि करिनाच्या लग्नात अमृताने तिला तयार केलं होतं. तसेच एका मुलाखतीत सारा म्हणाली होती की, ती करिनाची सर्वात मोठी चाहती आहे. तर करिनानेही करणच्या शोमध्ये साराला ‘क्लासी’ म्हटलं होतं. तसंच सारा फक्त दिसायलाच चांगली नसून ती तेवढी हुशारही आहे असंही करिना म्हणाली होती. बायकोला खुश करण्याच्या नादात रितेश देशमुख झाला ट्रोल, लोकांनी विचारलं ‘माणूस आहेस की पोपट?’ VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात