जोरदार हवेने 'या' अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस

जोरदार हवेने 'या' अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस

कधी कधी त्यांच्या कपड्यांचं कौतुक केलं जातं तर कधी त्यांना तोंडघशी पडावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 01 जून- बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच ते त्यांच्या फॅशनसाठीही ओळखले जातात. कधी कधी त्यांच्या कपड्यांचं कौतुक केलं जातं तर कधी त्यांना तोंडघशी पडावं लागतं. असाच एक अनुभव अभिनेत्री कियारा आडवाणीला आला. कियाराने निळ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला होता. आता फॅशनेबल कपडे घातलेली कियारा सुंदर दिसत होती यात काही वादच नाही पण हवेच्या एका झुळकेने तिला तोंडघशी पाडलं.

 

View this post on Instagram

 

#kiaraadvani ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आजही सलमानला आठवतात त्याचे 'हे' 5 सहकलाकार

कियारा काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांची नजर तिच्यावर गेली आणि ते तिचे फोटो काढू लागले. कियाराही त्यांना अगदी हसतमुखाने फोटो देत होती. त्यानंतर ती हळहळू पायऱ्या चढत बिल्डींगच्या आत जात होती, तेव्हाच ती सर्वांना बाय करण्यासाठी मागे वळली तेव्हा हवेची झुळूक आली आणि तिचा ड्रेस उडाला. तिने लगेच आपल्या हाताने ड्रेस सांभाळण्याचा प्रयत्न केला. कियाराने फार आत्मविश्वासाने तो क्षण तारून नेला. जर ती त्या क्षणाला घाबरली असती तर कदाचित साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं असतं. पण तसं काही झालं नाही.

बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार

कियारा आडवाणीच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती शाहिद कपूरसोबत कबीर सिंग सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तिने इंदू की जवानी सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. या सिनेमाची कथा ही इंदू नावाच्या मुलीभोवती फिरते. डेटिंग अप आणि लेफ्ट स्वाइप, राइट स्वाइप आणि त्यातून समोर आलेल्या प्रसंगातून घडते. याशिवाय ती अक्षय कुमार, करिना कपूर खान आणि दिलजीत दोसांजसोबत गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात गर्दीत अडकल्या आशा भोसले, स्मृती इराणींनी अशी केली मदत

VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

First published: June 1, 2019, 9:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading